‘थोडा काळ थांबा पक्ष प्रवेशाचे भूकंप दिसतील’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर निशाना
देवेंद्र फडणवीस यांनी 2023 चा अर्थसंकल्प मांडला. तो अर्थसंकल्प विरोधकांचं मनोबल खच्चीकरण करणार होता. तर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला अत्यंत लाभ देणार
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली होती. त्यांनी, सरकार पडणार असल्यानेच तातडीने सगळ्या फायलींवर स्वाक्षरी केल्यात जात असल्याचे म्हटलं होतं. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिली आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 चा अर्थसंकल्प मांडला. तो अर्थसंकल्प विरोधकांचं मनोबल खच्चीकरण करणार होता. तर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला अत्यंत लाभ देणार. त्यामुळे त्यांना असं वाटत आहे की, 24-25 लाही असा अर्थसंकल्प असेल यावरून विरोधकांच्या मनात धास्ती आहे.
त्यामुळेच त्यांचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या प्रमाणावर एकतर एकनाथ शिंदे नाहीतर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. तर याचा परिणाम त्यांच्या आमदारांवर देखिल झाला आहे. हे ही आमदार निघून जातील त्यामुळे एक घाबरलेला परिस्थितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मविआ आहे.
संजय राऊत यांच्या बोलणयावर किती विश्वास ठेवायचा. त्यांना किती उत्तर द्यायचं. आता त्यांच्याकडे राहिलेले लोक सुद्धा एकनाथ शिंदेंकडे येतील आणि महाविकास सांगितले लोक भाजपमध्ये. काळ थोडा बघा महाराष्ट्रामध्ये पक्ष प्रवेशाचे भूकंप दिसतील.
Published on: Mar 18, 2023 07:47 AM
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
