Vijay Wadettiwar : ‘हे तर कलंक, या नालायकांनी…’, वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप अन् केले गंभीर आरोप
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका महिलेच्या प्रसूतीसाठी तब्बल 10 लाख रुपये अनामत रुक्कम मागितल्याच्या प्रकरणावरून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना विजय वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबीयांवर गंभीर आरोप केलेत.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मंगेशकर कुटुंब ही लुटारुंची टोळी असल्याचे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी एकच घणाघात केला. ‘मंगेशकर कुटुंब ही लुटारुंची टोळी आहे. या कुटुंबाने कधी, कुठे दान करताना पाहिलं आहे का? खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्या माणसाला या नालायकांनी सोडलं नाही. यांच्यात कसली माणुसकी आहे. हे तर माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांचा संताप पाहायला मिळाला तर पुढे ते असेही म्हणाले की, अशा पद्धतीने मॅनेजमेंट चालवले जात असेल, गरिबांची लूट, शोषण केलं जात असेल तर हे कलंक आहे. यांना कोणीही साथ देऊ नये. यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणी यावेळी वडेट्टीवार यांनी केली. तर दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर धर्मादाय आयुक्तांकडून आणखी एक ठपका ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. गरिबांसाठीचा निधी मंगेशकर रूग्णालयाने कधी वारलाच नाही, असं आहावालात स्पष्ट केलंय.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...

