Vijay Wadettiwar : ‘AC मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, ऐपत नव्हती तर…’, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरलं
राज्यभरातील राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आवश्यक असणाऱ्या निधीपेक्षा कमी निधी शासनाकडून एसटी बँकेला देण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी... एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार की नाही? यावरून राज्यात संभ्रम निर्माण झालाय.
एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56 टक्केच वेतन जमा झालं आहे. एसटी महामंडळाला यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी देण्यात आला असून एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनाची रक्कम अपुरी असल्याचे कळतंय. तर उरलेलं 44 टक्के वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी सध्या चिंतेत आहेत. यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. ‘सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना काढल्या कशाला? सरकारला वाटलं नव्या योजना जाहीर करून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवू… पण परिश्रम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नये’, असा इशाराच विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. तर कोणाचे पगार थांबवायचे ते थांबवा, एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या, अशी मागणीच वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?

