पर्यावरणाचा विचार करत 2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येणार : Aditya Thackeray

यापुढे एखादी बस घ्यायची असेल तर किंवा बस भाडेतत्वावर घ्यायची असेल तर ती फक्त फक्त इलेक्ट्रिक बस असेल. आम्ही बेस्टच्या डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन सुरु करणार आहेत. अपारंपारिक विजेचा वापर करण्यावर आपल्याला यानंतर भर द्यावा लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई : सध्याच्या वातावरण बदलामुळे मुंईमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये भविष्यात फक्त इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच 2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येतील. आगामी काळात 1900 एलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जातील, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यानी दिली. वातावरणीय बदलाचा मुंबईवर मोठा परिणाम होत आहे. अचानकपणे वातावरण बदलल्यामुळे अतिवृष्टीसारख्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे सरकारतर्फे महत्त्वाचं पाऊल जात आहे. यापुढे एखादी बस घ्यायची असेल तर किंवा बस भाडेतत्वावर घ्यायची असेल तर ती फक्त फक्त इलेक्ट्रिक बस असेल. आम्ही बेस्टच्या डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन सुरु करणार आहेत. अपारंपारिक विजेचा वापर करण्यावर आपल्याला यानंतर भर द्यावा लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI