Nala Sopara | नालासोपाऱ्यात बहूजन विकास आघाडी सेनेत राडा

सारस्वत हॉलमधील लसीकरण केंद्रावर शिवसेनेचे पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून, त्यांच्याच नागरिकांना बोलावून लस देत असल्याचा नागरिकांनी आरोप केल्यानंतर बविआचे माजी नगरसेवक अतुल साळुंखे यांनी केंद्रावर जाऊन जाब विचारला.

नालासोपारा : नालासोपाऱ्यात लसीकरणावरून बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांमध्ये तुंबळ राडेबाजी झाली आहे. नालासोपारा पश्चिम पाटणकर पार्क परिसरातील सारस्वत हॉल चक्रेधर येथील लसीकरण केंद्रावर आज दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. सारस्वत हॉलमधील लसीकरण केंद्रावर शिवसेनेचे पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून, त्यांच्याच नागरिकांना बोलावून लस देत असल्याचा नागरिकांनी आरोप केल्यानंतर बविआचे माजी नगरसेवक अतुल साळुंखे यांनी केंद्रावर जाऊन जाब विचारला. यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी संतोष टेंबुलकर आणि इतर कार्यकर्त्यांत ही तुंबळ राडेबाजी झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI