Chembur : देवीला घातला माऊंट मेरीचा पोशाख! पुजाऱ्याला स्वप्न अन्…. स्मशानात जे घडलं ते धक्कादायक; बघा VIDEO
चेंबूरमधील वाशीनाका स्मशानभूमीत देवीच्या मूर्तीला माऊंट मेरीचा पोशाख घातल्याची घटना समोर आली आहे. काही मिशनरी लोकांनी हे कृत्य केल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुजाऱ्याला अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेनंतर हिंदू संघटनांनी स्मशानभूमीत आरती केली.
मुंबईतील चेंबूर येथील वाशीनाका स्मशानभूमीत एका देवीच्या मूर्तीला माऊंट मेरीचा पोशाख घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बजरंग दलाने या घटनेला देवीचा अवमान असल्याचे म्हटले आहे. हिंदू संघटनांच्या आरोपानुसार, काही मिशनरी लोकांनी देवीच्या मूर्तीला माऊंट मेरीचा पोशाख घातला होता. मूर्तीला माऊंट मेरीचे रूप देण्याची इच्छा देवीने स्वप्नात येऊन व्यक्त केल्याचा दावा पुजाऱ्याने केला होता, मात्र हिंदू संघटनांनी हा दावा फेटाळला आहे.
या प्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिशनऱ्यांनी पुजाऱ्याला पैसे देऊन हे कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपही हिंदू संघटनांनी केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. घटनेच्या निषेधार्थ हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीमध्ये आरती केली.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

