नटीला नटी म्हणायचं नाही तर काय…राऊत आणि जयंत पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राऊतांनी केलेल्या विधानावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होतेय. तर नटीला नटी नाही तर काय म्हणायचं? असं संजय राऊत म्हणाले आहेत. बघा जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या संवादात राऊत नेमकं काय म्हणाले?
अमरावतीमध्ये येऊन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राऊतांनी केलेल्या विधानावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होतेय. तर नटीला नटी नाही तर काय म्हणायचं? असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यातील संभाषण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जयंत पाटील म्हणताय, “अमरावतीचं मी टीव्हीवर बघितलं काल…”, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “गुन्हा दाखल केलाय असं कळलंय काहीतरी. आता मी तिला म्हटलं, नटीला नटी नाही तर काय म्हणणार? आता मला इंग्लिश शब्द येत नाहीत”, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “नाचा, नाची हे शब्द मराठीच आहेत.” यानंतर संजय राऊत म्हणतात, “हो, ती डान्सर आहे.” यावेळी संजय राऊत यांच्या बाजूला बसलेले नितीन बानगुडे पाटील म्हणाले, “डान्सरला दुसरं काय बोलणार?”
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

