Corona Special Report | आता चिमुकल्यांना मास्कची गरज नाही, केंद्राचा नव्या गाईडलाईन्स जारी

केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. यानुसार लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir) अजिबात देऊ नये, तसंच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे.

केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. यानुसार लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन (Remdesivir) अजिबात देऊ नये, तसंच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊच नये असं या गाईडलाईन्समध्ये निक्षूण सांगितलं आहे. सौम्य लक्षणांमध्ये ऑक्सिजन पातळी 94 टक्क्यांच्या आसपास असू शकते. याशिवाय घशात खवखव, श्वास घेताना, खोकताना त्रास जाणावणे यांचा समावेश आहे. शिवाय ताप असेल तर पॅरासिटामोल गोळी देताना 4-6 तासांचं अंतर ठेवा. खोकल्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या करा. विलगीकरणात गेलेल्या मुलांशी पालकांनी सकारात्मक चर्चा करावी. ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी मुलांना 6 मिनिट वॉक टेस्ट करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.