Mumbai vaccination | मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंदच
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या (शनिवार, 10 जुलै)लसीकरण बंद राहणार आहे. तसेच रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद राहील.
लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर वॉर्डातील 7 लसीकरण केंद्रांतून आतापर्यंत 1 लाख नागरिकांचे लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची महिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..