AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक पिंपळगाव कृषी बाजार समितीत बनकर की कदम?, कोण मारणार बाजी?

नाशिक पिंपळगाव कृषी बाजार समितीत बनकर की कदम?, कोण मारणार बाजी?

| Updated on: Apr 29, 2023 | 10:00 AM
Share

VIDEO | नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात

नाशिक : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. तर इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी 30 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. आज पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल हाती येऊ लागला आहे. ग्रामीण भागातील राजकारणात कृषी उत्पन्न बाजार समित्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी भवन येथे एकूण दहा टेबलवर मतमोजणी होत आहे. काल शांततेच्या वातावरणात एकूण 97.6% मतदान झाले. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महत्त्वाची असल्याने यातून काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.