Mumbai : निर्दयी आई सापडली! तिनं चक्क मरीन ड्राईव्हच्या फुटपाथवर बाळाला सोडलं

अवघ्या 15 दिवसांच्या बाळाला वाऱ्यावर सोडणारी ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 20, 2022 | 12:41 PM

मुंबई : मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस (Mumbai Police) ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं आपल्या 15 दिवसांच्या बाळाला फुटपाथ ठेवून दिलं आणि ती निघून गेली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाली आहे. अवघ्या 15 दिवसांच्या बाळाला वाऱ्यावर सोडणारी ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौपाटीवर असलेल्या एका बस स्टॉपच्या आडोशाला एक अज्ञात व्यक्ती आढळून आली होती. 15 दिवसांच्या एका बाळाला या बस स्टॉपवर एका महिलेनं बाळाला बेवारसपणे सोडून दिलं होतं. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर मरीन ड्राईव्ह (Marine Drive Police) पोलिसांनी माणुसकी जपत नवजात बाळाला कुशीत घेतलं आणि त्याला पोलीस स्थानकात आणलं होतं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें