‘भावी खासदार’ अविष्कार दादा भुसे, मालेगावातील ठाकरेंच्या सभेपूर्वी झळकले पोस्टर्स
VIDEO | मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार भुसे यांचा बॅनवर भावी खासदार असा उल्लेख, काय आहे प्रकार?
नाशिक : शिवसेना नेते दादा भुसे यांचं होम ग्राऊंड असलेल्या मालेगावात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दादा भुसे निशाण्यावर असणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे ज्या मार्गावरून सभेच्या ठिकाणी जाणार त्या मार्गावर मुंबई आग्रा महामार्गावर दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांचे भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर्स झळकवण्यात आल्याचे पाहायाला मिळत आहे. आज उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा होत असताना दोन्ही गटांमध्ये चांगलेच कुरघोडीचे राजकारण घडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर्स नाशिक मध्ये पाहिले मिळाले होते. त्यानंतर आज मालेगावात अविष्कार भुसे यांची भावी खासदार म्हणून उल्लेख असणारी पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

