तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच दिसतेय का? गौतमी भडकली अन्…
VIDEO | मी कुठं महाराष्ट्राचा बिहार केलाय?; गौतमी पाटीलनं 'त्या' पुढाऱ्याचा घेतला समाचार
पंढरपूर : गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंय. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. गौतमीचा डान्स म्हटला तर टांगा पलटी घोडे फरार अशी प्रेक्षकांची गर्दी असते. बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घराच्या छतावर जाऊन गौतमीच्या दिलखेचक अदा न्याहाळताना दिसतो. मात्र गौतमी पाटील हिचा डान्स आणि त्यासाठी होणाऱ्या गर्दीवर महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका छोटा पुढारी घनश्याम दराडे याने गौतमी पाटीलला चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळालं. “गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. गौतमी पाटलांचा कोणत्याही कार्यक्रम शांततेत पार पडलाय, असं दिसत नाही. लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका. तो अश्लीलतेचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यानं दिला होता. यावर आता गौतमी पाटील हिनं प्रतिक्रिया दिली आहे. मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? असा सवाल करत गौतमी काहीशी संतापल्याचे पाहायला मिळाली. तर माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?,असे म्हणत यावेळी तिने छोटा पुढारी घनश्याम दराडे याच्या आरोपाचा समाचारही घेतला.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

