मी शेतकरी कुटुंबातील मुलगा, कारखान्याचा संचालक होईन असं वाटलं नव्हतं, दत्तात्रय भरणेंनी सांगितला राजकीय प्रवास

“2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत बिघाडी होऊ नये, म्हणून मी माघार घ्यायला तयार होतो, असं दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत.

“2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत बिघाडी होऊ नये, म्हणून मी माघार घ्यायला तयार होतो, मी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही सांगितलं होतं, मात्र 2019 ची निवडणूक ही तुलाच लढवायची आहे, हे मला शरद पवारांनीच सांगितलं आणि हे अजित पवार (Ajit Pawar) यांनाही सांगू नका” असंही त्यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) यांच्या राजकारणाला शरद पवारांनीच खिळ घातली का? अशी चर्चा रंगली आहे. इंदापूरच्या जागेविषयी भरणे पुण्यात आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलत होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI