पीएचडी करून काय दिवे लावणार?, अजितदादा यांचं धक्कादायक विधान; सभागृहात…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत भुवया उंचावणारं वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्या धक्कादायक विधानाची सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा सुरूये. काय केले अजित पवार यांनी सभागृहात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत धक्कादायक विधान?
नागपूर, १३ डिसेंबर २०२३ : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यातील चर्चिल्या जाणाऱ्या मुद्यांवरून अधिवशेन चांगलंच गाजतंय. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत भुवया उंचावणारं वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्या धक्कादायक विधानाची सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा सुरूये. सारथी, महाज्योती, बार्टी या संस्थांमध्ये पीएचडी करण्यासाठी अॅडमिशन, शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी होतेय अन् त्याची संख्याही वाढली त्यामुळे पीएचडीसाठी शिष्यवृत्ती देणं गरजेचं आहे का? यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. तर 200 जणांना शिष्यवृत्ती तर परदेशी शिक्षणासाठी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. दरम्यान, यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अजित पवारांना काही सवाल केलेत. यावर अजित पवार यांनी मिश्कीलपणे जे वक्तव्य केले त्याचीच सध्या प्रचंड चर्चा होत आहे. पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात?, अशी टिपण्णी अजित दादांनी केल्याचे पाहायला मिळाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

