‘तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना वाटतं शेवटची…’, अजित पवारांचा कुणाला खोचक टोला?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांची आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा सुरू झाली आहे. शरद पवार यांचे पुरोगामी विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्वाभिमान यात्रेचे आयोजन करत असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले
‘एकदा बारामतीकरांना कोणतरी मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा’, असे अजित पवार म्हणाले होते. अजित दादांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार आता बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही, असे संकेत दिसताय. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, अजित पवार यांच्यावर बोलण्यावर मी इतका मोठा नाही. जय पवार आणि युगेंद्र पवार अशी लढाई झाली तर मी अजित पवार यांचा आशीर्वाद नक्कीच घेईल. तर युगेंद्र पवारांच्या या प्रतिक्रियेवर पुन्हा अजित पवार यांनी पलटवार केलाय. आता सगळ्यांनाच आमदार व्हायचं आहे. तरूणांना वाचतं पहिलीच संधी आहे. दवडता कामा नये, असे म्हणत अजित पवारांनी खोचक टोला लगावला.
Latest Videos
Latest News