‘मविआ’च्या काळात माझ्या अटकेचा कट, फडणवीस यांचा आरोप; यासह ४ मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील २४ ताज्या घडामोडी

हर्षदा शिनकर

Updated on: Jan 25, 2023 | 7:33 AM

राज्यतील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

महाविकास आघाडीच्या काळात मला अटक करण्याचा कट रचला होता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलिसांना वरिष्ठांचा आदेश आल्याचाही त्यांनी दावा केला. तर देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेची कोणतीही योजना नव्हती, असे म्हणत माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीसांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

जनतेचे मुळ मुद्दे दुर्लक्षित करण्यासाठी हा प्रयत्न होत असून देवेंद्र फडणवीस यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, विनायक राऊत यांच्यासह नाना पटोले यांनी टीका केली आहे. राज्यतील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यानंतर दिली आहे. तर मातोश्रीवर काल ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची दीड तास बैठक झाली. या बैठकीत कसबा पोट निवडणुकीची चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासह ४ मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील २४ ताज्या घडामोडी…

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI