अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र; म्हणाले, निराशेला गाडून कामाला लागा अन्…
राहुल गांधींनी किती निवडणुका जिंकल्या? असा सवाल करत लोकसभा निवडणुकीतील लोकसभा अशा आहेत जिथं ६ विधानसभांपैकी ५ ठिकाणी आपल्याला बहुमत होतं. केवळ एका विधानसभा मतदारसंघातील बहुमतामुळे विरोधक जिंकले होते, असे अमित शाह यांनी म्हटले.
राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिल्याचे पाहायला मिळत आहे. २०२४ ला महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठा विश्वास व्यक्त केला. तर २०२९ मध्ये एकट्या भाजपच्या जिवावर सरकार आणायचंय असंही अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर म्हणालेत. यासोबत महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार येणार असा शब्द देतो असेही अमित शाह म्हणालेत. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा-दशा बदलेल, हे अनुभवावरून सांगतो, असं कार्यकर्त्यांना अमित शाह म्हणाले. निराशेला गाडून कामाला लागा, असे आवाहन करत अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र देत त्यांच्यात उत्साह भरला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यन्वित करा, मंडळ आणि वॉर्ड स्तरावर राज्य सरकारच्या योजना पोहोचवा, असे आवाहनदेखील अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना केले.