Nilesh Rane : शिंदेंचा PA बनायलाही तयार… शेवटच्या श्वासापर्यंत… मालवणच्या प्रचारसभेत निलेश राणेंचा निर्धार
, एकनाथ शिंदे यांनी मालवण येथील प्रचारसभेत निलेश राणेंचे मोठे कौतुक केले. निलेश राणे हे शिवसेनेचे खणखणीत नाणे असून ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहतील असेही राणेंनी म्हटले होते. राणे हे कधी घाबरत नाहीत, त्यांना नारायण राणे साहेबांचे बाळकडू मिळाले असल्याचेही शिंदे यांनी अधोरेखित केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणेंचे मोठे कौतुक केले. मालवण येथील प्रचारसभेत त्यांनी निलेश राणे यांना शिवसेनेचे खणखणीत नाणे संबोधले. या सभेत बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे. इलाका किसकाभी हो धमका निलेश राणेही करेगा… असंही एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, व्हॅनिटी व्हॅनमध्ये एकनाथ शिंदे, निलेश राणे, उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर निलेश राणेंनी शेवटच्या श्वासापर्यंत शिंदे यांची साथ सोडणार नसल्याचे आणि त्यांचे पीए बनायलाही तयार असल्याचे म्हटले होते. निलेश राणे कधी घाबरत नाहीत कारण त्यांना राणे साहेबांचे बाळकडू मिळाले आहे, असेही शिंदे यांनी म्हटले.
Published on: Dec 01, 2025 12:49 PM
Latest Videos
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

