Eknath Shinde : आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी नाही… मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर… शिंदेंचा बाण थेट ठाकरेंवर
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी अॅनाकोंडा आणि गांडूळ असे उपमा वापरून अमित शहा आणि शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. अधिवेशनाच्या समाप्तीनंतर जयंत पाटील यांनी सरकारवर गंभीर प्रश्न अनुत्तरित ठेवल्याचा आरोप केला.
विधान परिषदेतील एका चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मुंबईला लुटणारा “रहेमान डकैत” कोण, हे सर्वांना माहिती आहे, असे अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले. मुंबईला लुटणाऱ्यांना पाणी पाजणारी महायुतीच खरी “धुरंधर” असल्याचे विधानही त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे काम फक्त घरी बसायचे नसते, असे सांगत त्यांनी आपल्या कार्यपद्धतीचे समर्थन केले. “आम्ही रस्ते धुतले, तिजोऱ्या नाही धुतल्या,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचा आरोप केला. तसेच, नागपूर अधिवेशनात सभागृह मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चालवले असतानाही काही विरोधकांनी दोन तासदेखील सभागृहात बसण्याची तसदी घेतली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेत्यांनी केवळ “विरोधी पक्षनेता” याशिवाय दुसरे काहीही बोलले नाही, हे दुर्दैवी असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनीही कडवट शब्दांत पलटवार केला. मुंबई गिळायला “अॅनाकोंडा” बसलेला आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. मात्र, अॅनाकोंडाला उत्तर देण्याऐवजी “गांडुळाची औलाद” उत्तर देते, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केले. गुलाम आणि गांडुळाला फणा काढण्याचा अधिकार नसतो, असे जोरदार विधान करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
अॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!

