Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE: .. म्हणून बाळासाहेबांनी सत्तेवरही लाथ मारली; राज ठाकरेंनी सांगितला तो भावुक किस्सा
Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE Updates in Marathi: राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा एक किस्सा सांगितला.
युत्या आघाड्या होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस , मराठी भाषा यावर तडजोड होणार नाही, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे. वरळी डोम येथे आपल्या भाषणात राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक भावनिक किस्सा सांगितला.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेच्या आग्रहासाठी हा कडवटपणा आला कुठून. आमच्या धमन्यात आला कुठून. बाळासाहेबांसोबतचे अनेक प्रसंग आहेत. १९९९चा एक प्रसंग आहे. युतीचं सरकार येणार की नाही अशी स्थिती होती. पवार साहेबांना राष्ट्रवादी स्थापन केला होता. भाजप शिवसेनेच्या वादात काहीच होईना. दिवसा मागून दिवस चालले. काही होईना. एके दिवशी मातोश्रीत बसलो होतो. दुपारची वेळ होती. अचानक गाड्या लागल्या. साडेतीन वाजले असतील. प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. म्हणाले, बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं. मी म्हटलं त्यांची झोपेची वेळ आहे. म्हणाले, नाही भेटायचं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला असं त्यांना सांगा. मी म्हटलं काय झालं. ते म्हणाले, सुरेश दादा जैन यांना मुख्यमंत्री करायचं. एवढं बाळासाहेबांना सांगायचं. मी बाळासाहेबांच्या रुमममध्ये गेलो. आम्ही अरेतुरे करायचो. म्हटलं ऐ काका उठ. म्हणाले, काय रे. म्हटलं जावडेकर आले. मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला. बाळसाहेब म्हणाले, काय झालं. म्हटलं, ते म्हणाले सुरेशदादांना करायंच. बाळासाहेब म्हणाले, त्यांना सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल हे त्यांना सांग. मराठी या विषयासाठी या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्याच्यावर झाले असेल तो मराठीसाठी तडजोड करेल का. युत्या आघाड्या होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा यावर तडजोड होणार नाही, अशी परखड भूमिका यावेळी राज ठाकरेंनी मांडली आहे.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
