शरद पवार यांच्या जीवाला धोका, ‘तुझा लवकरच दाभोळकर होणार…’, कुणाची धमकी?
VIDEO | शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, ट्विटरवरून धमकी दिल्यानं एकच खळबळ
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने शरद पवार यांना जीवे मारण्याची ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली आहे. सुप्रिया सुळे याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी रवाना झाल्या आहेत. दरम्यान, सौरभ पिंपळकर या नावाच्या ट्वीटर हँडलवरून शरद पवार यांना ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे.
Published on: Jun 09, 2023 11:06 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
