AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! तुझा लवकरच दाभोळकर होणार, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

सर्वात मोठी बातमी ! तुझा लवकरच दाभोळकर होणार, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 09, 2023 | 11:42 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून एका व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या. पोलीस आयुक्तांना भेटून त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनीही या प्रकरणी कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.

तो भाजपचा कार्यकर्ता?

सौरभ पिंपळकर या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंटवर ही व्यक्ती अमरावतीची असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजपचा कार्यकर्ता असल्याचंही त्याच्या अकाऊंटवर नोंदवलेलं आहे. मात्र, हे अकाऊंट ओरिजिनल आहे की फेक आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

दरम्यान, शरद पवार यांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी या दोन्ही धमक्यांची माहिती पोलीस आयुक्तांना दिली. तसेच संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला.

facebook post

facebook post

धमकी देणे दुर्देवी

शरद पवार यांना आलेल्या धमकीप्रकरणी सुप्रिया सुळेंकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने दखल घ्यावी. शरद पवारांना धमकी येणं दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरुर असतात. मात्र, इतक्या खालच्या स्तरावर जाऊ नये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

कोणीही असेल कारवाई करा

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर दिली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?