Maharashtra Breaking Marathi News Live | गुलाबराव पाटील यांचे संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र

| Updated on: Jun 10, 2023 | 7:12 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | गुलाबराव पाटील यांचे संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : मीरा रोड हत्याकांडामध्ये ट्विस्ट. आरोपीने हत्या केल्याचा गुन्हा नाकारला. त्यामुळे पोलिसांसमोर गुन्ह्याचा उलगडा करण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. भाजपची येत्या 11 जून रोजी बैठक. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार. पटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार. आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Jun 2023 10:53 PM (IST)

    गुलाबराव पाटील यांचे संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र

    जळगाव : माझ्यावर अनेक लोक टीका करतात. पण मी घाबरत नाही. खासदार संजय राऊत सारख्याला मी घाबरत नाही. राऊत माझ्यावर टीका करतो. परंतु खान्देशचा असा हा एकच मायका लाल आहे गुलाबराव पाटील त्याला संजय राऊत घाबरतो. अशा एकेरी शब्दात संजय राऊत यांचा नामोल्लेख करता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

    कोकणात जरी गेलात तरी गुलाबराव पाटील नावाचं वेगळं वादळ आहे. विधानसभेत 288 पैकी अनेक आमदार आहेत. त्यांना मी ओळखत नाही. परंतु विधानसभेमध्ये असा एक बुलंद आवाज आहे गुलाबराव पाटील नावाचा ज्याला कोणी महाराष्ट्र ओळखत नसेल तर नवलाई. असा हा नेता म्हणून गुलाबराव पाटलांनी स्वतः आपली पाठ थोपटून घेतली. जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी झालेल्या जाहीर सभेत गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केले आहे.

  • 09 Jun 2023 10:14 PM (IST)

    आनंद दवे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

    पुणे : आनंद दवे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांनी वंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या इस्लामबाबतच्या मतांचा अभ्यास करावा मग बोलावे, असा सल्ला दिला. आनंद दवे म्हणाले, औरंगजेब याच मातीतला त्याचं समर्थन केलं तर काय चुकीचं. हे प्रकाश आंबेडकर यांचं वाक्य पूर्णपणे हिंदू द्रोही आणि औरंगी कृत्याचे समर्थन करणारे आहे.

    हे अफझलखान, शाहिस्ता खान यांचे फोटो मिरवत नाहीत. कारण महाराज आणि महाराष्ट्र त्यांना पुरून उरला होता. पण औरंगजेब हा हिंदूंच्या भावना भडकवण्यासाठीच वापरला जातो. त्याच बरोबर तो शेवटचा मुस्लिम राजा होता. या आठवणी जाग्या ठेवण्यासाठीच त्याचा उपयोग केला जातोय. प्रकाश आंबेडकर यांना ते कळत आहे. पण या सर्वांनाच मुस्लीम मतांची भूक लागली आहे, असा आरोपही आनंद दवे यांनी केलाय.

  • 09 Jun 2023 10:01 PM (IST)

    पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक!

    पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करत गणराया चरणी नतमस्तक झाले.यावेळी अश्वांचे पूजन करीत निर्मलवारी-हरितवारी करिता श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना करण्यात आली. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या हिरा-मोती या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले.

  • 09 Jun 2023 09:35 PM (IST)

    काँग्रेस कार्यकर्ते विकास टिंगरे यांनी स्वत:ला का संपवलं? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर

    पुणे : काँग्रेस कार्यकर्ते विकास टिंगरे यांच्या आत्महत्येचं कारण पोलीस तपासातून समोर आलं आहे. जुगारात पैसे हरल्याने त्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. २३ मे रोजी पुण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी विकास टिंगरे यांनी त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. टिंगरे यांना दोन महिलांनी गोवा येथे ऑनलाईन जुगार आणि कसीनो खेळण्यासाठी बोलावले होते. मात्र जुगारामध्ये ते हरले आणि त्यांनी पुण्यात येऊन आत्महत्या केली होती, असा आरोप टिंगरे यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता. दुर्गेश विकास टिंगरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अरपिता दास आणि तिची बहीण सुश्मिता दास या दोघींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील विकास टिंगरे आणि आरोपी महिलांची ऑनलाईन गेमिंग आणि जुगार खेळण्याचा नादात ओळख झाली होती. त्या दोघींनी त्यांना वारंवार फोन करून जुगार खेळण्यासाठी गोवा येथे बोलावले. त्यांना ऑनलाईन जुगार आणि कसीनो जुगार खेळण्यासाठी भाग पाडले. यामध्ये ते पैसे जिंकले खरे मात्र पैसे जिंकल्यानंतर त्यांना "कॅश आउट" होऊ न देता त्यांना पुन्हा जुगार खेळण्यास भाग पाडले. पण यावेळी ते जुगारात हरले. हरल्यानंतर निराश झालेल्या विकास यांनी पुण्यात त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • 09 Jun 2023 09:03 PM (IST)

    Dada Bhuse On Sanjay Raut Threat | संजय राऊत यांना धमकी, दादा भुसे यांची खोचक प्रतिक्रिया

    मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्यात आली. या धमकीवरुन मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राउतांना धमकी आलेली ऑडियो क्लिप ही wwf कुस्तीसारखी असल्याचं म्हणत भुसे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

  • 09 Jun 2023 08:50 PM (IST)

    Maharashtra Govt textile | राज्य सरकारकडून नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर

    मुंबई | राज्य सरकारकडून नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आलं आहे. कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने हे नवीन वस्त्रोद्योगधोरण जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

    यात 25 हजार कोटींची गुंतवणूक होऊ शकते. यासाठी कापसाची प्रक्रिया क्षमता 50 टक्क्यांनी वाढवण्याचं उद्धिष्ट आहे.त्यानुसार कापसाची प्रक्रिया क्षमता ही 30 वरून 80 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

    गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन धोरण जाहीर

  • 09 Jun 2023 08:39 PM (IST)

    Varsha Gaikwad Mumbai Congress | वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड

    राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर माजी शिक्षणमंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. मुंबईसोबतच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 09 Jun 2023 08:27 PM (IST)

    Rohit Pawar On Bjp | भाजपनेही माफी मागावी अन्यथा..., रोहित पवार यांचा भाजपला इशारा

    कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. खोट्या बातम्यांचा आधार घेऊन आदरणीय पवार साहेब यांची बदनामी करणाऱ्या प्रदेश भाजपने खोटी माहिती प्रसारित करताना जनाची नाही तर मनाची तर वाटू द्यावी. तसेच हा फडतूसपणा आता बंद करावा, अशा शब्दात रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपला सुनावलंय.

    तसेच प्रदेश भाजपनेही माफी मागायला हवी अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिलाय.

    रोहित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

  • 09 Jun 2023 08:15 PM (IST)

    ITI Admission | आयटीआय प्रवेश प्रक्रियेला 12 जूनपासून सुरुवात

    औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अर्थात आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया 12 जून पासून सुरूवात होणार आहे. याबाबतची माहिती राज्य सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल डीजीआयपीआरवरुन देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना https://admission.dvet.gov.in या वेबसाईटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

    आयटीआय प्रवेश प्रक्रियेला 12 जूनपासून सुरवात

  • 09 Jun 2023 07:59 PM (IST)

    चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना इंदापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    इंदापूर पोलिसांनी मोठी कामगिरी करत दोन जबरी चोरी करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघेही चोरटे चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करायचे. विशेष म्हणजे पोलिसांनी या दोघांकडून तब्बल ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. र्योधन कांतीलाल चोरमले आणि रोहन नेताजी बाबर अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. काही गुन्हांची कबुली देण्याची देखील शक्यता आहे.

  • 09 Jun 2023 07:46 PM (IST)

    कपिल पाटील यांनी केली महाविकास आघाडीवर सडकून टीका

    कल्याणमध्ये पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केलीये. कपिल पाटील म्हणाले की, जातीय दंगली घडवण्यासाठी कोणी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेवर आरोप करत असेल तर त्यांनी दिव्या खालचा अंधार पहावा. ज्या माणसाने अशा प्रकारचे कृत्य केले ते कुठल्या भावनेने केले हे समजून घेतले पाहिजे भारतीय जनता पार्टी व शिवसेना अशा प्रकारचे कृत्य करत नाही. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर औरंगजेबांचे फोटो घेऊन कोणी नाचत असेल तर याचा जेवढा निषेध करावे तेवढे कमी आहे.

  • 09 Jun 2023 07:40 PM (IST)

    औरंगजेबाचे स्टेटस ठेवणे युवकाला पडले महागात, गुन्हा दाखल 

    सोलापुरामध्ये अजून एक मोठा प्रकार उघडकीस आलाय. सोलापुरात एका मुस्लिम युवकाने औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते. औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा स्थानिकांनी आरोप केला. शोएब मंगरूळकर असे स्टेटस ठेवणाऱ्या युवकाचे नाव आहे. जल जल कर मर जाओगे, फिर भी तुम कुछ उखाड नही पाओगे, असे त्याने लिहिले होते. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. सोलापुरातील नवीन विडी घरकुल भागात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

  • 09 Jun 2023 07:34 PM (IST)

    कपिल पाटील करणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मोठी विनंती

    नुकताच खासदार पंचायत राज्य राज मंत्री कपिल पाटील यांनी अत्यंत मोठी मागणी ही केली आहे. कपिल पाटील म्हणाले की, भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्याच्या वाद थांबवण्यासाठी समन्वय समिती नेमण्याची गरज आहे. इतकेच नाही तर थेट ही विनंती कपिल पाटील हे थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहेत.

  • 09 Jun 2023 07:27 PM (IST)

    सरकार कोणतेही असू, दंगल व्हावी, असे कुणालाच वाटत नाही- दादा भुसे

    नुकताच दादा भुसे यांनी दंगली संदर्भात अत्यंत मोठे भाष्य केले आहे. दादा भुसे म्हणाले की, औरंगजेबचा उदोउदो करणारी कोणती औलाद आहे, तिचा शोध घेणे गरजेचे आहे. वारंवार ज्या घटना घडत आहेत, देशद्रोहाचे जे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे आणि कठोर कारवाई करण्याची देखील गरज आहे. नागरिकांना विनंती आवाहन करेल की भूल थापांना बळी पडू नका.

  • 09 Jun 2023 07:24 PM (IST)

    ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले

    आज सकाळी एक धक्कादायक घटना धाराशिव येथे घडलीये. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. भरधाव टिप्पर अंगावर येताच ओमराजे निंबाळकर यांनी उडी मारली आणि ते थोडक्यात बचावले. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीस अटक देखील करण्यात आलीये. ओमराजे निंबाळकर हे सकाळी व्यायाम करायला जात ही घटना घडली होती. टिप्पर चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने खासदार ओमराजे यांच्या अंगावर घातले होते. मात्र ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खाली उडी मारली त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला.

  • 09 Jun 2023 07:19 PM (IST)

    पालखी सोहळ्यासाठी 4 हजारांहून अधिक पोलिस तैनात 

    पालखी प्रस्थान सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिसांनी दोन्ही पालखीसाठी 4 हजारावरून अधिक पोलिस तैनात केले आहेत. दोन्ही पालखी प्रस्थानासाठी अशी असेल पोलिस संख्या पोलिस आयुक्त 1, अप्पर पोलीस आयुक्त 1, पोलीस उपायुक्त 4, सहाय्यक पोलीस आयुक्त 13, पोलीस निरीक्षक 62, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलिस उप पोलीस निरीक्षक 214, अंमलदार 2733, होमगार्ड 411, वॉर्डन- 150, क्यू आर टी पथक, दोन्ही पालखी प्रस्थानासाठी त्या परिसरात 345 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिलीये.

  • 09 Jun 2023 07:14 PM (IST)

    मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत- खासदार श्रीकांत शिंदे

    नुकताच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मोठे भाष्य केले आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले की, केंद्रात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे. त्याच दिशेने आम्ही काम करत आहोत. करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.
  • 09 Jun 2023 06:42 PM (IST)

    भिगवण ग्रामपंचायतीमध्ये मोठा राडा

    इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायतीची बोलावलेली विशेष ग्रामसभा पुरेशा संख्याबळा अभावी तहकुब करण्यात आली. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेकडून मंजूर करण्यात आलेली विकास कामे ही आँनलाइन ओपन टेंडर पध्दतीने करायची का ई कोटेशन पध्दतीने करायची या मुद्द्यावरुन हा गोंधळ झाल्याची माहिती समजत आहे. अरेरावीसह अर्वाच्च भाषेत शिवीगाळ झाल्याचंही समजत आहे.

  • 09 Jun 2023 06:37 PM (IST)

    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन साजरा

    नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवरील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन साजरा होत आहे. विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षक प्रबोधिनीत हा कार्यक्रम होत असून, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थित आहेत.

  • 09 Jun 2023 06:30 PM (IST)

    अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत राडा

    अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर नाफेडच्या चणा खरेदीत राडा पाहायला मिळाला आहे. ठाकरे गटाचे नेते प्रकाश मारोटकर यांनी ग्रेडरच्या कानशिलात लगावली आहे. शेतकऱ्यांना चणा मोजणी करिता सर्रास पैसे मागितल्याचा ठाकरे गटाच्या प्रकाश मारोटकर यांनी आरोप केला आहे.

  • 09 Jun 2023 06:22 PM (IST)

    पीएमपीएल प्रशासनाकडून सोडण्यात येणार 142 जादा बसेस

    देहूतून संत तुकाराम महाराजांची उद्या निघणार पालखी निघणार आहे. वारी सोहळ्याला उद्यापासून होणार सुरुवात होणार आहे. देहूत जाण्यासाठी हजारो भाविक पुण्यात दाखल झालेत. पालखी प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी देहू आळंदीला जाण्यासाठी पीएमपीएलच्या सर्व बस स्थानकावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वारी दरम्यान पीएमपीएल प्रशासनाकडून 142 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

  • 09 Jun 2023 06:15 PM (IST)

    फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न- खडसेंची टीका

    राज्यात एकनाथ शिंदे यांचा सरकार आलं तेव्हापासून आणि देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाले तेव्हापासून गावागावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. जळगावमध्ये ते बोलत होते.

  • 09 Jun 2023 06:07 PM (IST)

    पुण्यातील 'या' भागात पावसाची हजेरी

    दौंड - पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील कुसेगावमध्ये सायंकाळी 5 च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावलीय. प्रचंड उन्हाने हैराण झालेल्या कुसेगावकरांना पावसामुळे दिलासा मिळालाय. या पावसाने हवेत अल्हाददायक गारवा निर्माण केलाय.

  • 09 Jun 2023 05:54 PM (IST)

    संजय राठोड यांची दिल्लीवारी चर्चेत

    मंत्री संजय राठोड यांची उद्या दिल्लीवारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शाहांकडे भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे. संजय राठोड यांच्या दिल्ली वाऱ्यांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंत्री पद टिकविण्यासाठी त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.

  • 09 Jun 2023 05:48 PM (IST)

    भारतात रेकॉर्डब्रेक खाद्य उत्पादन, केंद्र सरकारने दिली माहिती

    अवकाळी पाऊस, अनेक नैसर्गिक संकटे यामुळे यंदा खाद्य उत्पादन घसरण्याची अटकळ बांधण्यात येत होती. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पण यंदा, वर्ष 2022-23 मध्ये भारतात खाद्य उत्पादन जोरदार असेल असा अंदाज केंद्र सरकारने वर्तविला आहे. सर्व प्रमुख पिकांचे उत्पादन 3305.34 लाख टन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2013-14 या वर्षांपेक्षा हा आकडा 650 लाख टन अधिक आहे.

  • 09 Jun 2023 05:39 PM (IST)

    संजय राऊत आणि सुनील राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणात दोघे ताब्यात

    संजय राऊत आणि सुनील राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस लवकरच गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करणार आहेत. सुनील राऊत यांना कॉल करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. सकाळचा भोंगा बंद करण्याची भाषा आरोपींनी वापरली होती.

  • 09 Jun 2023 05:26 PM (IST)

    पूर्वीचे सरकार व्यापाऱ्यांचे शोषण करणारे- उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

    पूर्वी व्यापाऱ्यांचे शोषण होत होते. गुंडागर्दी करण्यात येत होती. काही ठिकाणी तर व्यापाऱ्यांकडून वसुली पण करण्यात येत होती. पण सध्या व्यापाऱ्यांना दिलासा आहे. त्यांना सुरक्षित वाटत आहे. भाजपच्या सरकारमध्ये सर्वच व्यापारी न घाबरता, कसलीही भीती न बाळगता व्यापार करत आहेत.

    उत्तराखंड येथे व्यापाऱ्यांचे संमेलन भरविण्यात आले. त्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केला दावा

  • 09 Jun 2023 05:17 PM (IST)

    पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत जवळ

    प्राप्तिकर खात्याने (Income Tax) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता 30 जून 2023 ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर पॅनकार्ड बाद करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना बँकेचा व्यवहार, इतर व्यवहार करता येणार नाहीत. बँकिंग व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. सध्या पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड द्यावा लागतो. मुदत संपल्यावर नागरिकांना ही संधी देण्यात येणार नाही. त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसेल.

    या 30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी केली नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल. मुदतीनंतर जोडणी केल्यास जोडणी न करणाऱ्याला 10,000 रुपये दंड बसू शकतो.

    सविस्तर माहिती इथे वाचा

  • 09 Jun 2023 05:09 PM (IST)

    तर चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर - जितेंद्र आव्हाड संतप्त

    माझा डीएनए जेव्हा तुम्ही काढता, तेव्हा तो माझ्या आईच्या चारित्र्यावर हल्ला असतो, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. कळत, नकळत चित्रा वाघ जर आपल्या आईची बदनामी करत असतील तर त्यांना यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देईल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

    चित्रा वाघ यांनी केला होता मेंदू सडल्याचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप. त्यानंतर दोघांमध्ये रंगेल वाकयुद्ध

  • 09 Jun 2023 05:05 PM (IST)

    धमकी प्रकरण अत्यंत गंभीर, तपास करा- धनंजय मुंडे

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात तपास करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. अशा गोष्टी कदापी खपवून घेणार नाही. पुरोगामी राज्य म्हणून देशात महाराष्ट्राची ओळख आहे. असा राज्यात या प्रकारची संस्कृती कोण रुजवत आहे, याचा शोध घेतला पाहिजे.

  • 09 Jun 2023 04:42 PM (IST)

    सत्तेसाठी भाजप मृतदेहांच्या राशीवर चालू शकते - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील

    सत्तेसाठी भाजप मृतदेहांच्या राशीवर चालू शकते अशी खळबळजनक टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. टिपू सुलतानला भाजपा व्हिलन करीत आहेत, मग देवेंद्र फडणवीस यांनी टिपूची तलवार घ्यावी आणि संसदेवर जावे, संसदेच्या लायब्ररीवर हल्ला करावा आणि तिथे असलेला टिपूचा फोटो फाडून टाकावा असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

  • 09 Jun 2023 04:19 PM (IST)

    धमकीची चिंता मी करीत नाही, पोलीसांवर माझा विश्वास - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

    कोणत्याही घटनेवर मत मांडण्याचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आणि धमक्या देऊन जर कोणाचा आवाज बंद करू शकेल असे कोणाला जर वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आपल्या धमकीची चिंता नाही, आपला पोलीसांवर विश्वास आहे अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

    शरद पवार यांना समाजमाध्यमावर तुमचा नरेंद्र दाभोळकर करू अशी धमकी आली आहे. त्यावर शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की राज्याची कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी. राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखणे याची जबाबदारी सरकारवर आहे. पोलिस दलावर पूर्ण विश्वास आहे आणि धमकीची चिंता मी करत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

  • 09 Jun 2023 04:00 PM (IST)

    महाराष्ट्राचे गृहमंत्री नेमकं काय करतात ? शरद पवारांना मिळालेल्या धमकीवरून डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली नाराजी

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री नेमकं करतात काय असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला . तसेच कायद्याचा धाक राहिला नसल्याची टीकाही त्यांनी केली.

  • 09 Jun 2023 03:57 PM (IST)

    शरद पवार यांच्या बद्दल धमकी सहन करणार नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करतील - रवी राणा यांची प्रतिक्रिया

    राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मिळालेल्या धमकी प्रकरणी रवी राणा यांची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या बद्दल धमकी सहन करणार नाही. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी सरकार घेईल, असे ते म्हणाले.

    सरकार सक्षम आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करतील, असेही त्यांनी नमूद केले.

  • 09 Jun 2023 03:51 PM (IST)

    कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे , त्यांनी काळजी घ्यावी - शरद पवारांची प्रतिक्रिया

    कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे , त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी, धमकी मिळाल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    मी धमकीची चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारीची ही सूत्रं आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

  • 09 Jun 2023 03:37 PM (IST)

    शरद पवारांना आलेली धमकी अतिशय गंभीर - संजय राऊत

    शरद पवारांना आलेली धमकी हे अतिशय गंभीर आहे. पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावण्याचा हा प्रकार आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

    महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा मलीन करण्याचा डाव आहे. दंगली आडून राज्यातील उद्योग बाहेर नेण्याचा कट सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

  • 09 Jun 2023 03:26 PM (IST)

    शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा तत्काळ द्या, त्यांच्या मागण्या 15 जून पर्यंत मान्य करा - रविकांत तुपकर यांचा सरकारला अल्टिमेटम

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकात तुपकर यांनी सरकारला पुन्हा अल्टीमेटम दिले आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा तत्काळ द्या, त्यांच्या मागण्या 15 जून पर्यंत मान्य करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा मुंबई येथील AIC च्या कार्यालयातून 20 व्या माळ्यावरून उड्या मारून आत्महत्या करू असा इशाराच त्यांनी दिला आहे.

    बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच सरकारचे बियाणे उत्पादक करणाऱ्या कंपन्यांसोबत साटेलोटे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

  • 09 Jun 2023 03:16 PM (IST)

    पवारांना ट्विटरवरून आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी मी स्वतः वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

    शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

  • 09 Jun 2023 03:07 PM (IST)

    आलेल्या अडचणीला तोंड देत काम केले पाहिजे - नारायण राणे

    आपण आलेल्या अडचणींना तोंड देत काम केले पाहिजे. भारत पाचव्या क्रमांकावर आला आहे,  पण आपल्याला 2030 पर्यंत तिसऱ्या स्थानावर जायचे आहे. आपले उत्पन्न, जीडीपी वाढल्याशिवाय प्रगती करू शकत नाही, असे नारायण राणे म्हणाले.

    आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय , असे म्हणतो, पण त्यात जो जय असतो त्या मागे आपण का जात नाही, आपण पैसा का कमवत नाही ? असा सवाल नारायण राणेंनी विचारला.

  • 09 Jun 2023 03:00 PM (IST)

    राज्यात दंगली घडवल्या तर कोणाला फायदा आहे, हे सर्वांना माहिती आहे- जयंत पाटील

    शरद पवार यांना सोशल मिडीयावर मिळालेल्या धमकीसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना प्रतिक्रीया दिली आहे. धमकी देणाऱ्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. या राज्यात दंगली घडवल्या तर याचा कोणाला फायदा आहे हे आता सर्वांना माहिती आहे असा टोला ही त्यांनी लगावला. लोकप्रियता कमी झाल्यामुळे काही लोकं असा प्रकार करत असतील मात्र राष्ट्रवादी काँग्रेस तसा पक्ष नाही असे जयंत पाटील म्हणाले.

  • 09 Jun 2023 02:46 PM (IST)

    सायबर पोलिसांकडून सौरभ पिंपळकरसंदर्भात माहिती घेतली जात आहे

    शरद पवार यांना ज्या ट्विटर अकाउंटवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्या अकाउंटची माहिती घेण्यात येत असल्याचे अमरावतीच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले. सौरभ पिंपळकर इतरही गुन्ह्यांमध्ये अटक होता अशी माहिती समोर आली आहे.

  • 09 Jun 2023 02:37 PM (IST)

    नेत्यांची प्रतीमा मलिन करण्याचा प्रयत्न- अजित पवार

    पोलिस खात्याने कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी तसेच जे कोणी दोषी असतील त्यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. आपली आपली भुमीका समाजापुढं देत असताना कारण नसतांना इतर पक्षातील नेत्यांची बदनामी करायची, त्यांच चारित्र्य हनन करायचं, त्यांची जनमानसात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा, अलिकडे घडत असलेल्या या प्रकाराचा मी तिव्र शब्दात निषेध करतो असे अजित पवार म्हणाले.

  • 09 Jun 2023 02:26 PM (IST)

    विचाराची लढाई विचाराने लढावी- अजित पवार

    सोशल मिडीयावरून द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी कायदा करा, अशी मागणी अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. सौरव पिंपळकर या ट्विटर अकाउंटवरून शरद पवारांना 'तुमचाही दाभोळकर होणार' अशी धमकी देण्यात आली आहे. या अकाउंटच्या बायोमध्ये 'मी भाजपचा कारयकर्ता' असे नमुद असल्याचे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले. तो खरच भाजपचा कार्यकर्ता आहे का हे मला माहिती नाही असेही पवार म्हणाले. विचाराची लढाई विचाराने लढावी असे मत अजित पवार यांनी मांडले.

  • 09 Jun 2023 02:13 PM (IST)

    या' प्रवृत्तीला गृहमंत्री उत्तेजन देत आहेत- संजय राऊत यांचा आरोप

    संजय राऊत यांनी मिळालेल्या धमकी प्रकरणात त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सतत घडत असलेल्या या प्रकाराला गृहमंत्री उत्तेजन देत आहेत असे म्हणात त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. तक्रारीची चेष्ठा करणाऱ्याकडून कुढली अपेक्षा करावी असेही राऊत म्हणाले. या आधीही आलेल्या धमकी प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे संजय राऊत यांनी नमुद केले. हा सर्व प्रकार गृहमंत्र्यांना एक दिवस महागात पडेल असेही ते म्हणाले.

  • 09 Jun 2023 01:57 PM (IST)

    पवार यांची सुरक्षा वाढवावी- प्रकाश आंबडेकर

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली. या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. शरद पवार, संजय राऊत यांना धमकी येणे ही गंभीर बाब असून शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. दोन्ही नेत्यांना पोलिसांनी पूर्णपणे संरक्षण दिले पाहिजे, शासन ही दक्षता घेईल अशी आम्ही आशा बाळगतो, असे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले आहे.

  • 09 Jun 2023 01:53 PM (IST)

    पावसाळा सुरु होणार, पण नालेसफाई नाहीच

    पावसाळ्याच्या पूर्वी शहरातील नाले साफसफाईसाठी नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांची उधळण दरवर्षी केली जात असते, मात्र खरंच नालेसाफाईचे काम पूर्ण होतात का? हा प्रश्न आहे. नालेसफाई होत नसल्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु शहरातील अनेक नाल्यांची साफसफाई झाल्या नसल्यामुळे नाले साफसफाई कधी होणार? असा प्रश्न आता शहरातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

  • 09 Jun 2023 01:41 PM (IST)

    तीन हजारासाठी एकाची हत्या

    लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे केवळ तीन हजार रुपयांच्या वादातून मजुराची हत्या करण्यात आली आहे. रेणापूर येथील गिरिधारी तपघाले यांनी गावातील लक्ष्मण मरकड याच्याकडून व्याजाने तीन हजार रुपये घेतले होते. आरोपी लक्ष्मण मरकड त्याचे वीस हजार रुपये मागत होता. यावरून झालेल्या वादातून आरोपीने गिरिधीरी यांना बेदम मारहाण करीत जखमी केले. त्यात गिरिधारी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

  • 09 Jun 2023 01:30 PM (IST)

    शरद पवार यांना धमकी, रोहित पवार यांचा सरकारवर आरोप

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली. या प्रकरणानंतर रोहित पवार आक्रमक झाले आहे. पवार साहेबांसारख्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी येणे म्हणजे विशिष्ट घटकांवर सरकारची जरब नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. सध्याचं राज्य सरकार हे नपुंसक असल्याचे सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं निरीक्षण योग्य असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारला थोडं जरी जबाबदारीचं भान असेल तर या प्रकरणी थातूरमातूर कारवाई न करता धमकी देणाऱ्यांच्या आणि त्यामागील मास्टरमाईंडच्या तातडीने मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

  • 09 Jun 2023 01:19 PM (IST)

    शरद पवार यांना धमकी, कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली. या प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. फडणवीस यांनी शरद पवार यांना धमकी देणाऱ्या ट्विटर अकाऊंटची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.

  • 09 Jun 2023 01:15 PM (IST)

    संजय राऊत यांचे गृहमंत्र्यांना पत्र

    शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना एका निनावी व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सुनील राऊत यांच्या फोनवरून ही धमकी आली होती. या प्रकरणी संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी हे तिसरे पत्र लिहिले आहे. यापूर्वी पत्र लिहून काही कारवाई झाली नसल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

  • 09 Jun 2023 01:11 PM (IST)

    शरद पवार यांना धमकी हा गंभीर प्रकार - संदीप देशपांडे

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना या पद्धतीने जर धमकी येत असेल तर ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी त्यावर लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. संजय राऊत यांनी ही आलेली धमकी नवीन नाही. त्यांना एकदाची काय ती सुरक्षा देऊन टाका, म्हणजे धमक्या येणार नाहीत, असा उपरोधिक टोलाही देशपांडे यांनी राऊत यांना लगावला. स्वतःच्या आजूबाजूला गुंडगिरी असणारी माणसे पाळली की धमक्या येणार, असे त्यांनी म्हटले.

  • 09 Jun 2023 01:04 PM (IST)

    शरद पवार दिल्लीला जाणार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी आल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. राज्यात सुरु असणाऱ्या या घडामोडींमुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. शरद पवार शुक्रवारी दिल्लीत दाखल होणार आहे. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शरद पवार उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व खासदार आणि राष्ट्रीय नेते कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

  • 09 Jun 2023 12:53 PM (IST)

    अहमदनगर | शरद पवारांना आलेल्या धमकीचा मी निषेध करतो - आमदार निलेश लंके

    शरद पवारांना आलेल्या धमकीचा मी निषेध करतो... असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलं आहे. निलेश लंके पुढे निषेध व्यक्त करत म्हणाले, 'देशातील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये पवार साहेबांचा सिंहाचा वाट आहे. त्यांना अशा पद्धतीने धमकी कोणी देत असेल तर हा घाणेरडा प्रकार आहे... चुकीच्या पद्धतीने त्यांना धमकी देत असेल तर राज्य सरकारने बंदोबस्त केला पाहिजे...' असं निलेश लंके म्हणाले...

    या संदर्भात मी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र देणार आहे. साहेबांच्या बाबतीत काय घडलं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल... असं देखील निलेश लंके म्हणाले...

  • 09 Jun 2023 12:48 PM (IST)

    जाणीवपूर्वक काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न - अजित पवार

    'तुमचाही दाभोलकर होणार...' अशी धमकी शरद पवार यांना देण्यात आली आहे. विचारांची लढाई विचारांनी लाढूया.. अधिकांचा गैरवापर करु नये.. असं देखील अजित पवार म्हणाले.. सौरभ पिंपळकर ट्विटर अकाऊंटवरून पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे तो कोण आहे आणि त्याला असं करण्यास कोणी भाग पाडले याचा तपास केला पाहिजे... असं अजित पवार म्हणाले.

    सौरभ पिंपळकर अकाऊंट भाजपाचा उल्लेख असल्याचा खुलासा देखील अजित पवार यांनी यावेळी केला.. धमकी देणाऱ्याला अटक झाली पाहिजे.. असं अजित पवार म्हणाले..

  • 09 Jun 2023 12:33 PM (IST)

    शरद पवार आणि संजय राऊत धमकी प्रकरणानंतर महत्त्वाची बैठक

    मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. गृहमंत्री फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांची बैठक सुरु आहे. 'मेघदूत' बंगल्यावर सध्या महत्त्वाची बैठक सुरु आहे. शरद पवार आणि संजय राऊत धमकी प्रकरणानंतर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

  • 09 Jun 2023 12:28 PM (IST)

    डोंबिवली | 5 वर्षीय चिमुकलीने वडिलांसोबत गाठलं एव्हरेस्ट बेस कॅम्प

    डोंबिवलीतील 5 वर्षीय चिमुकलीने वडिलांसोबत एव्हरेस्टचं बेस कॅम्प गाठलं आहे. ज्यामुळे चिमुकलीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. वडिलांच्या प्रोत्साहनाने चिमुरडीने केली 17 हजार 598 दुत उंचीवर चढाई. प्रिशा असं चिमुकलीचं नाव आहे. वडिलांनी चिमुकलीकडून तयारी करुन घेतली होती. अशात बाप लेकीच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे..

  • 09 Jun 2023 12:23 PM (IST)

    यवतमाळ | यवतमाळच्या नवीन व्हीआयपी शासकिय विश्राम भवनाला आग

    यवतमाळच्या नवीन व्हीआयपी शासकिय विश्राम भवनाला आग लागली आहे. आगीत विश्राम भवनातील मिटिंग हॉल, स्टोर रूम जळून खाक झालं आहे. आगीत आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. शिवाय आग कशी लागली...याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती समोर येताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत...

  • 09 Jun 2023 12:16 PM (IST)

    पुणे | केंदुर येथील कान्होराज महाराजांच्या पालखीचं प्रस्थान

    पुणे | आळंदी जवळच्या केंदुर येथील कान्होराज महाराजांची पालखी प्रस्थान झाली. यावेळी पालखी रथाचे सारथ्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. यावेळी माजी आमदार विलास लांडे यांनी पालखी रथाच्या बैलांची वेसण धरत पालखी मार्गस्थ केली. त्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे सारथ्य करत असलेल्या रथाला विलास लांडे यांनी मार्गस्थ केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या...!

  • 09 Jun 2023 12:11 PM (IST)

    मला आलेल्या धमक्यांबाबात गृहमंत्री गंभीर नाहीत - संजय राऊत

    मला आलेल्या धमक्यांबाबात गृहमंत्री गंभीर नाहीत, असे आरोप करत संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे . धमक्यांच्या चेष्टा करणाऱ्या फडणवीस यांना हे महागात पडेल. पवार आणि मला आलेल्या धमक्या सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

    आम्ही सुरक्षेची मागणी केली नाही. धमक्या देणाऱ्यांना मुख्यमंत्री संरक्षण देतात. सत्ताधाऱ्यांची धमकी देण्याची वृत्ती... आजपर्यंत मला अनेक धमक्या आल्यात असं देखील संजय रऊत म्हणाले.

  • 09 Jun 2023 12:00 PM (IST)

    पालघरमधील पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमारांना शिंदे सरकारचं गिफ्ट

    पालघरमधील पश्चिम किनारपट्टीला शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात आलाय. सातपाटी बंदर विकासासाठी राज्य सरकारने 281 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे बंदराच्या पायाभूत विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत राज्य सरकारने या निधीला मंजुरी दिलीये. यामध्ये अनेक कामांच्या विकास आराखड्याचा समावेश करण्यात आला आहे. या कामाचे एकूण अंदाजपत्रके रक्कम ही 281 कोटी चार लाख 89 हजार 300 एक रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. या निधीमुळे सातपाटी बंदरासह पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमराणा मोठा दिलासा मिळणार आहे.

  • 09 Jun 2023 11:57 AM (IST)

    दीपक केसरकर यांची नारायण राणे यांच्याशी जवळीक, 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चर्चा

    केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे दोघेही सिंधुदुर्गातील असले तरी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून महाराष्ट्राला अवगत आहेत. मात्र परवा मुख्यमंत्री सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना व्यासपीठावर दीपक केसरकर नारायण राणेंना नारळपाणी देतानाचा एक व्हिडिओ सिंधुदुर्गात विविध मथळ्याखाली जोरदार व्हायरल होत आहे. नारळपाणीच नाहीतर केसरकर यांनी काजूची ही राणेंना ऑफर दिली. नेहमी माध्यमातून एकमेकांना चॅलेंज करणारे हे नेते, ढुंकूनही एकमेकांकडे न पाहणा-या या नेत्यांनी अशी अचानक तलवार म्यान कशी केली याचीच चर्चा सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणात सुरू आहे.

  • 09 Jun 2023 11:51 AM (IST)

    नांदेडमध्ये शेतकऱ्यांना मान्सूनचे वेध, शेत शिवारात शेतकऱ्यांची लगबग

    नांदेडमध्ये शेतकऱ्यांना आता मान्सूनचे वेध लागले आहेत, त्यामुळे शेत शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येतेय. पेरणीसाठी रान तयार करण्यासाठी शेत शिवारातला कचरा वेचून गोळा करत त्याची विल्हेवाट लावण्यात येतेय. दरवर्षी पेक्षा यंदा मान्सून उशिराने येत असल्याने शेतकऱ्यांत काहीशी चिंता पसरलेली आहे. त्यामुळे यंदा धूळपेरणी करण्यासाठी एकही शेतकरी धजावत नसल्याचे चित्र नांदेडमध्ये दिसतंय.

  • 09 Jun 2023 11:49 AM (IST)

    अकोला जिल्हात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना दणका

    अकोला जिल्हात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 21 ग्रामपंचायत सदस्यांना दणका देण्यात आला आहे तर दोन तालुक्यातील ग्रामपंचायतींचे 21 सदस्य अपात्र ठरले आहेत. यासह पाच तालुक्यातील प्रकरणात तहसील कार्यालयावर सुनावणी प्रक्रिया सुरु आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात 17 ग्रामपंचायत सदस्यांना आणि मूर्तिजापूर तालुक्यातील 4 ग्रामपंचायत सदस्यांना अशा एकूण 21 सदस्यांना ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र ठरविण्यात आल आहे.

  • 09 Jun 2023 11:45 AM (IST)

    कोल्हापूर दंगलीचा मास्टरमाईंड शोधा, नवनीत राणा यांची मागणी

    कोल्हापुरमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचणारे आणि कोल्हापूर दंगलीचे मास्टरमाईंड सरकारने शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली. तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे या महाराष्ट्रला वेगळी दिशा कोणी तरी दाखवत आहे. त्यामुळे औरंगजेब महाराष्ट्रमध्ये चालणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिली

  • 09 Jun 2023 11:42 AM (IST)

    धमकीच्या ट्विटनंतर शरद पवार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्या आली आहे. सौरभ पिंपळकर या ट्विटरवर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे. तुमचा देखील दाभोळकर होणार, असे म्हणत शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. ट्विटमध्ये खालच्या शब्दात शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. दरम्यान धमकीच्या या ट्विटनंतर शरद पवार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. कार्यालयात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

  • 09 Jun 2023 11:36 AM (IST)

    प्रियांका गांधी लोकसभा लढवणार की नाही? सोनिया गांधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

    आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेस मोठी रणनिती आखत आहे. त्या अंतर्गत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे. दरम्यान, प्रियांका गांधी निवडणूक लढवणार की नाही, याच्या चर्चा रंगत होत्या. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रियांका गांधी लोकसभा लढवणार नाहीत, असा निर्णय सोनिया गांधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर प्रियांका गांधी यांचा लोकसभा लढवण्यास नकार असल्याचेही समोर आले आहे.

  • 09 Jun 2023 11:26 AM (IST)

    शरद पवार धमकी प्रकरण, पवारांना काही झालं तर गृहखातं जबाबदार - सुप्रिया सुळे

    सुप्रिया सुळे यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलिसांत धाव घेतली. यावेळी शरद पवार यांना काही झालं तर या प्रकरणाला गृहखातं जबाबदार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

  • 09 Jun 2023 11:22 AM (IST)

    बाजार समितीत तुरीची आवक वाढली; दररोज चार हजार क्विंटलची विक्री

    मृग नक्षत्रला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीची लगबग सुरू केली आहे. मात्र मागच्या खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबीन या पिकाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही या मालाची विक्री केली नाही. मात्र ऐन खरीपाच्या तोंडावर तुरीचे भाव वाढल्याने आता शेतकरी तूर विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहे. आणि कपाशी, सोयाबीन, खते बी- बियाणे खरेदी करीत आहे. यवतमाळ बाजार समितीमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून तुरीचे भाव वधारले असून 9 हजार ते 10 हजार 500 रुपये क्विंटल पर्यंत दर मिळत आहे.

  • 09 Jun 2023 11:17 AM (IST)

    संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन

    मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. संदीप देशपांडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दादर येथील शिवाजी पार्क येथे बेकायदेशीर जमाव गोळा करून औरंगजेबचा पुतळा जाण्याच्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, कोल्हापूर आणि अहमदनगर येथे औरंगजेबच्या उदात्तीकरणावरून मोठा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले.

  • 09 Jun 2023 11:04 AM (IST)

    शरद पवारांना आलेल्या धमकीमागे भाजप नाही - संजय काकडे

    शरद पवारांना आलेल्या धमकीमागे भाजपचा काहीही संबंध नाही. हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे. मात्र गृहमंत्री सक्षम आहेत. यामागे कोण आहे याचा शोध घेतील, अशी प्रतिक्रिया संजय काकडे यांनी दिली आहे.

  • 09 Jun 2023 11:02 AM (IST)

    संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

    ठाकरे गटातील नेते आणि खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुनील राऊत यांच्या फोनवर ऑडिओ क्लिपद्वारे ही धमकी आली आहे. सकाळचा 9 भोंगा बंद करा असे ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. बंदुकीने गोळ्या घालू असे धमकीमध्ये म्हटले आहे.

  • 09 Jun 2023 10:57 AM (IST)

    शरद पवारांबद्दल केलेल्या टीकेवर संजय काकडेंकडून निलेश राणेंचा निषेध

    निलेश राणेंनी शरद पवारांबद्दल केलेल्या टीकेचा मी वैयक्तिक निषेध करतो. संजय राऊत, निलेश राणे यांच्यावर पक्षाने आणि मीडियाने बंदी घातली पाहिजे. कुत्रा आणि इतर जनावरांच्या उपमा दिल्या जातात. संजय राऊत आणि निलेश राणे यांच्याकडे मीडियाने जाऊ नये. निलेश राणेबाबत अमित शहा आणि पक्षाच्या श्रेष्ठीना मी पत्र लिहणार आहे, असे संजय काकडे यांनी सांगितले.

  • 09 Jun 2023 10:55 AM (IST)

    गृहमंत्रालयाने तातडीने लक्ष घालावं - सुप्रिया सुळे

    यात जातीने लक्ष घालतील असा आयुक्तांनी मला शब्द दिला आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि शरद पवार देशाचे नेते आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्रालय फेल होतेय, असा आरोप करत याकडे अमित शाहांनी लक्ष घालावं, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.

  • 09 Jun 2023 10:45 AM (IST)

    शरद पवारांना धमकी येणं दुर्दैवी - सुप्रिया सुळे

    शरद पवार यांना आलेल्या धमकीप्रकरणी सुप्रिया सुळेंकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने दखल घ्यावी. शरद पवारांना धमकी येणं दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरुर असतात. महाराष्ट्रात दडपशाही सुरु आहे. हे द्वेषाचं राजकारण आहे. या धमकीचा पाठपुरावा करुन कारवाई करावी आणि आम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. ही जबाबदारी महराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाची आहे.

    ज्या पद्धतीने एक मुलगा त्या मुलीसोबत लिव्हिंगमध्ये असताना तिची हत्या करतो. तसेच हॉस्टेलमधील घडलेली घटना क्रूरच आहे. तुम्ही बेटी बचाव, बेटी पढाओ चा नारा देताय. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढतेय. अमित शाहांना विनंती आहे, महाराष्ट्रात काय घडतंय याकडे लक्ष द्यावं.

  • 09 Jun 2023 10:41 AM (IST)

    अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना कोल्हापुरात दाखल

    कोल्हापुरातील दंगल सदृश्य परिस्थितीनंतर राज्याच्या गृहविभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना कोल्हापुरात दाखल झाले आहेत. सक्सेना यांनी दगडफेक आणि तोडफोड झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. पाहणीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तणाव प्रकरणी सर्व पैलूंचा तपास होणार आहे. अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर संजय सक्सेना यांनी माहिती दिली.

  • 09 Jun 2023 10:39 AM (IST)

    धमकी देणे आमच्या रक्तात नाही - चंद्रशेखर बावनकुळे

    धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर दिली आहे.

  • 09 Jun 2023 10:33 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्या आली आहे. सौरभ पिंपळकर या ट्विटरवर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे. खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या तक्रार देण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. तुमचा देखील दाभोळकर होणार, असे म्हणत शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. ट्विटमध्ये खालच्या शब्दात शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. 'राजकारण महाराष्ट्राचं' या ट्विटर हँडलवरुन धमकी देण्यात आली आहे.

  • 09 Jun 2023 10:29 AM (IST)

    विधानसभा अध्यक्षांना घटनेच्या चौकट सोडून निर्णय देता येणार नाही - संजय शिरसाट

    भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संम्रभ असतो. मत मांडणे यात काही गैर नाही, आमचे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कल्याणबाबत निर्णय घेतील. यांना औरंगजेबाचा पुळका येण्याची गरज काय आहे. बाळासाहेब आज असते तर यांच्यावर लाथ मारली असती आणि बाहेर काढले असते. संजय राऊत हे दलाल आहेत. बाळासाहेब हे बाळासाहेब होते. संभाजी नगरमध्ये जिल्ह्याच्या मेळाव्यात 200 लोक होते. वाटले तर आम्ही रस्त्यावर उतरू आम्हाला दंगल नको, पण कोणी अशा गोष्टीला प्रोत्साहन देत असेल तर आम्ही पाहू.

    संजय राऊत वेडा आहे, पक्ष नाही हा कुठे देशाचे राजकरण करतो. या देशात लोकशाही आहे म्हणून तुम्ही बोलू शकता. तुम्हाला लोकांचे माथे भडकवण्यासाठी यांना ओवीसी पाहिजे, यांना दंगे करायचे आहेत. हे खूनी आहेत. ह्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. दंगली आणि अशा घटना घडतात तेव्हा सरकारसोबत असायला पाहिजेत. हे विरोधी पक्षवाले नेहमी अशा गोष्टी शोधत असतात.

  • 09 Jun 2023 10:21 AM (IST)

    नांदेडमध्ये अमित शाहांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यातील पहिली सभा उद्या सायंकाळी नांदेडमध्ये होणार आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सभेसाठी अलिशान आणि वाटरप्रूफ टेंट उभारण्यात येत आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी भाजपकडून प्रचंड मोठा खर्च केला जात आहे. त्यामुळे नांदेडच्या या सभेकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.

  • 09 Jun 2023 10:18 AM (IST)

    सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने चालवली बस

    एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने बस चालवली आहे. अर्चना अत्राम असे महिला बस चालकाचे नाव आहे. सासवड डेपोतून त्यांनी नीरासाठी बस चालवली. अत्राम यांचा बस चालवल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

  • 09 Jun 2023 10:11 AM (IST)

    भाजपचे हिंदुत्व तकलादू - संजय राऊत

    तरुणांची थी भडकावून उन्मादाचा डाव आहे. महाराष्ट्रात दंगली घडवून उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक दंगलीमागे राजकीय हात आहे. कर्नाटक गेलं म्हणून महाराष्ट्रात औरंगजेबाचा वापर केला. हिंदू-मुस्लिमांमध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूर-नगरमधील दंगली रोखण्यास गृहमंत्री अपयशी ठरले. भाजपने आपल्या मनातील औरंगजेब आधी काढावा.

    मुख्यमंत्री एखनाथ शिंदे डोकं शांत करायला वैष्णोदेवीला गेल्याचे राऊतांनी म्हटले आहे. तसेच भविष्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला तर मिंदे गटातील चार नेत्यांना वगळण्याच्या सूचना अमित शाहांनी दिल्याचा संजय राऊत यांनी दावा केला.

  • 09 Jun 2023 10:07 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील 24 प्रकल्पांमध्ये 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध

    नाशिक जिल्ह्यातील लहान-मोठ्या अशा 24 प्रकल्पांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ 25 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्यास आणखी आठ ते दहा दिवस असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी या काळात जिल्ह्यात 27 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा दोन टक्के कमी पाणीसाठा आहे. तसेच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात 26 टक्के पाणीसाठा आहे. तसेच इतर पाच धरणांमध्ये दहा टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे.

  • 09 Jun 2023 10:05 AM (IST)

    कोल्हापूरात फिल्मी स्टाईलने धाडसी दरोडा

    कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे कात्यानी ज्वेर्लस दुकानावर धाडसी दरोडा पडल्याची घटना घडली आहे. काल दुपारी दिवसाढवळ्या हातात बंदुक घेऊन दरोडा टाकण्यात आला. तब्बल एक कोटी 85 लाख रुपयांचा माल लुटल्याची प्राथमिक माहिती मिळते. रोख 2 लाख रुपये सुद्धा दरोडेखोरांनी लुटले. दुकानदाराने विरोध केल्याने दरोडेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबारात दुकानदार आणि सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. दरोडा सुरु असताना बाहेर जमाव जमल्याने जमावावर सुद्धा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

  • 09 Jun 2023 09:45 AM (IST)

    मुख्यमंत्री पुन्हा अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महिना अखेरीस अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. काष्ठ समर्पण समारोहासाठी राज्याचे नेते आयोध्यात जाणार आहेत. राम कथा पार्क या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. आयोध्यातील राम मंदिरासाठी लागणारे सागवानाची लाकडं घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सागवान वृक्षाची लाकडी भेट देणार आहेत.

    भाजपचे जवळपास 300 नेते पदाधिकारी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. राम मंदिरासाठी लागणाऱ्या ४२ दरवाजांसाठी सागवान लाकडीचा वापर होणार आहे. भाजपकडून या कार्यक्रमाचं नियोजन केलं जाणार आहे.

  • 09 Jun 2023 09:40 AM (IST)

    ब्रिजभूषण सिंह 15 जून नंतर आपली भूमिका मांडणार

    कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण प्रकरण देशात चांगलचं चर्चेचं ठरलं आहे. ब्रिजभूषण सिंह 15 जून नंतरच आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती मिळाली आहे. कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी भूमिका बदलली आहे. ब्रिजभूषण यांच्या विरोधात सूड भावनेने तक्रार दाखल केल्याची कबुली अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दिली आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह 15 जून नंतर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 09 Jun 2023 09:34 AM (IST)

    शेतीचा वाद, बापाने पोराला संपवले

    वाशिमच्या इचोरी परिसरात शेतीवरून पती पत्नीमध्ये वाद झाला. पतीने पत्नी आणि दोन मुलांवर धारधार कुऱ्हाडीने वार केले. त्यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले आहेत, त्यातील एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपी फरार झाला असून आसेगांव पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

  • 09 Jun 2023 09:27 AM (IST)

    औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याने अहमदनगर जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

    औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याने अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव आणि पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन वेगळे-वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेवगावात १९ वर्षीय एका युवकावर तर पाथर्डी येथे तीन आणि एका अल्पवयीन युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे. पाचही युवकांना शेवगाव आणि पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कारवाई करत शांतता राखण्याचा अहवान केलं आहे.

  • 09 Jun 2023 09:23 AM (IST)

    विद्यार्थी बसले आमरण उपोषणाला

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बेलुरा गावात स्वातंत्र्यप्राप्तीपासून गावाला रस्ता नाही, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होते. शिवाय गावातील रुग्ण, गरोदर महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी खाटेवर टाकून रुग्णालयात न्यावे लागते. सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून देखील गावाला रस्ता मिळत नसल्याने आता गावातील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत.

  • 09 Jun 2023 09:12 AM (IST)

    औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यावरून आष्टीमध्ये एकावर गुन्हा दाखल

    बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील आझादनगर येथील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेट्स ठेऊन "बाप तो बाप रहेगा" असा मजकूर टाकल्याने तणाव निर्माण झाला होता. हिंदू संघटना एकत्र येत सदरील तरूणावर आष्टी पोलिसांत रात्री उशीरा गुन्हा दाखल करत हिंदू संघटनेच्यावतीने आष्टी बंदचे अवाहन करण्यात आले आहे.

  • 09 Jun 2023 09:09 AM (IST)

    सरकारच्या कृषी धोरणाविरुद्ध वंचितकडून कापसाची होळी

    केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कापसाचे दर कमालीचे घसरले आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात सध्या बियाणांचा काळाबाजार सुरू आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तहसिलदार कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर कापसाची होळी केली.

  • 09 Jun 2023 09:05 AM (IST)

    आदिवासी विकास महामंडळातर्फे चार तालुक्यामध्ये धान्य खरेदी सुरू

    गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळातर्फे चार तालुक्यामध्ये धान्य खरेदी सुरू झाली आहे. 34 केंद्रांपैकी 28 केंद्रावरती धान्य खरेदी सुरू आहे. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • 09 Jun 2023 09:03 AM (IST)

    अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी CM योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट

    अभिनेते पंकज त्रिपाठी हे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी CM योगी आदित्यनाथ यांची भेटली. ही भेट का झाली ते जाणून घ्या. वाचा सविस्तर....

  • 09 Jun 2023 08:56 AM (IST)

    हिंदी महासागरात इंडियन एअर फोर्सची मोहिम

    इंडियन एअर फोर्सच्या सुखोई-30 MKI फायटर विमानाने हिंदी महासागरात 8 तासांची मोहिम पार पाडली. यावेळी विमान उड्डाणवस्थेत असताना त्यात इंधनही भरण्यात आलं.

  • 09 Jun 2023 08:48 AM (IST)

    बालकाच्या रुग्णालयाला आग

    दिल्लीच्या वैशाली कॉलनी येथे बालकाच्या रुग्णालयाला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 9 गाडया आहेत. सर्व 20 नवजात अर्भकांना अग्निशमन दलाने सुखरुपरित्या बाहेर काढलं. त्यांना जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

  • 09 Jun 2023 08:44 AM (IST)

    244 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन

    राज्यात यंदा 244 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. गतवर्षीच्या तुलनेत १८ कोटी लिटरने वाढ झाली. गेल्या वर्षी राज्यात 226 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती. साखर आयुक्तालयाने ही माहिती दिली. सहकारी आणि खासगी साखर कारखाने आता साखर उत्पादन कमी करून त्याऐवजी मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे लक्ष देणार आहेत. यंदाच्या ऊस गळीत हंगामात राज्यातील साखर उत्पादन कमी होऊन, इथेनॉल उत्पादनात भरीव वाढ होईल.

  • 09 Jun 2023 08:34 AM (IST)

    मीरारोड हत्याकांड - आरोपीने पोलीस चौकशीत काय सांगितलं?

    "सरस्वती वैद्यने 3 जूनला आत्महत्या केली होती. तिच्या हत्येचा आरोप आपल्यावर येईल याची भिती वाटत होती. म्हणून मी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. त्याने मृतदेहाचे तुकडे केले व दुर्गंधी टाळण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये उकळवले" असं मीरारोड हत्याकांडातील आरोपी मनोज सानेने पोलीस चौकशीत सांगितलं.

  • 09 Jun 2023 08:30 AM (IST)

    औरंगाबाद नगर महामार्गावर भीषण अपघात

    औरंगाबाद नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनरची टेम्पोला धडक. धडकेत टेम्पोमधील सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलय. टेम्पोतून संसार साहित्य घेऊन नागरिक प्रवास करत होते. नागरिकांच्या टेम्पोला कंटेनर ने दिलेल्या धडकेत सहा जण जखमी झाले आहेत.

  • 09 Jun 2023 08:19 AM (IST)

    आता काही बोलणं योग्य नाही - बृजभूषण सिंह

    सर्व विषय कोर्टामध्ये आहे. 15 जून पर्यंत आरोपपत्र दाखल होणार असं सरकारने सांगितलय. तो पर्यंत काही बोलणं योग्य होणार नाही असं बृजभूषण सिंह म्हणाले. त्यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन बर्खास्त करावं यासाठी कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत होते. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले होते.

  • 09 Jun 2023 08:15 AM (IST)

    पुणे महापालिकेची शोभिवंत झाडांची खरेदी वादात

    पुणे महापालिकेच्या कुंड्या आणि विदेशी प्रजातीच्या शोभिवंत झाडांची खरेदी वादात सापडली आहे. G 20 परिषदेच्या निमित्ताने रस्ते व पुलांवरील सुशोभीकरणासाठी कुंड्या आणि झाडांची खरेदी करण्यात आली होती. निविदेतील किमतींची खातरजमा करण्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश. पुढील आठवड्यात होणार्‍या जी 20 परिषदेच्या निमित्ताने शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मार्गावरील पुलांवर विदेशी प्रजातीची शोभिवंत झाडे असलेल्या कुंड्या ठेवण्यात येणार

  • 09 Jun 2023 08:12 AM (IST)

    चंद्रकांत खैरे हा वसुली बहाद्दर माणूस - संदीपान भुमरे

    संदीपान भुमरे यांचं संजय राऊत यांना सडेतोड प्रत्युत्तर. आम्हाला बाप विचारता मग शरद पवार काय तुमचा बाप आहे का?. संजय राऊत यांनी तुमचा बाप कोण असा प्रश्न विचारल्यानंतर संदीपान भुमरे यांचं उत्तर. बाळासाहेब हेच आमचे बाप आहेत. बाळासाहेबांनीच आम्हाला घडवलं. चंद्रकांत खैरे हा वसुली बहाद्दर माणूस. याने किराणा दुकान सुद्धा लुटून काढलं. एमआयडीसी सुद्धा धुवून काढली असा आरोप संदीपान भुमरे यांनी केला.

  • 09 Jun 2023 08:08 AM (IST)

    राज्यात आज अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

    राज्यात आज ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर नैऋत्य मौसमी वारे केरळमध्ये काल दाखल झाले आहेत.11 जूनपर्यत गोव्यात तर 13 जून पर्यत कोकणात पाऊस दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तावला आहे. त्यामुळे जर पूर्व मोसमी पाऊस पडला तर नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळणार आहे.

  • 09 Jun 2023 07:44 AM (IST)

    आनंदाची बातमी ! पुण्यातील शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्प "युनो"कडून प्रमाणित

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनायटेड नेशन इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोप या संघटनेकडून पुण्यातील शिवाजी नगर हिंजवडी मेट्रो मार्गाची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन केले जात असल्याबद्दल संघटनेने प्रकल्पाला पायाभूत सुविधा पुरस्कार दिला आहे. पर्यावरण संवर्धन सार्वजनिक सुविधेचा विचार कामगारांची सुरक्षा कामातील सातत्य असे निकष संघटनेने केले तयार आहेत.

    जगभरातील मोठ्या प्रकल्पांची विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या पथकाकडून पाहणी केली जाते आणि त्यानंतर निवड होते. शिवाजीनगर ते हिंजवडी हा 23 किलोमीटरचा मार्ग असून आयटी कर्मचाऱ्यांना चांगली प्रवासी सुविधा मिळणार आहे.

  • 09 Jun 2023 07:27 AM (IST)

    मुंबईतील काळबादेवी येथील इमारतीला आग, कोणतीही जीवित हानी नाही

    मुंबईतील काळबादेवी येथील मुंबादेवी मंदिराजवळ एका सहा मजली इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग अत्यंत भयानक होती. काही क्षणात ही आग सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे इमारतीत 50 ते 60 जण अडकले होते. या सर्वांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं सांगण्यात आलं.

  • 09 Jun 2023 07:24 AM (IST)

    सोलापुरात लव्ह जिहादच्या संशयावरून एका युवकाला 15 जणांच्या टोळक्याची मारहाण, तरुण गंभीर जखमी

    सोलापुरात एका तरुणाला लव्ह जिहादच्या संशयावरून मारहाण करण्यात आली आहे. आमच्या धर्माच्या मुलीला फसवतो का? असे म्हणत ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप पिडीत युवकाने आपल्या फिर्यादित केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपीचा शोध घेतला जात आहे. या सर्व आरोपीं विरोधात भादंवि कलम 363, 324, 341, 143, 147, 149, 504 आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फिर्यादी असलेला तरुण सोलापूर शहरातील एका महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत आहे.

  • 09 Jun 2023 07:21 AM (IST)

    शरद पवार आणि औरंजेबमध्ये साम्य आढळणं साहजिकच; निलेश राणे यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलं आहे. राणेंना धमकी देऊन काहीच फायदा नाही. आम्ही कधीही कोणाच्या धमकीला भिक घातली नाही. समोर आलात तर दोन पायावर घरी परत जाणार नाही लक्षात ठेवा. राहिला विषय पवार साहेबांचा तर त्याच्यात आणि औरंगजेबमध्ये साम्य आढळणं साहजिक आहे, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. त्याआधी शरद पवार हे औरंजेबाचा पुनर्जन्म असल्याचं वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं होतं. त्यावर शिंदे गटानेही आक्षेप घेतला होता.

  • 09 Jun 2023 07:16 AM (IST)

    भंडाऱ्यात धानाने भरलेल्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, रस्त्यावर धानाची पोतीच पोती

    ट्रॅक्टर उलटल्याने धानाची पोती रस्त्यावर फेकली गेली. यात सुदैवाने कठलीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. सध्या रबी हंगामाअंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्रावर ट्रॅक्टर व अन्य साधनांनी धानाचे पोती नेण्याचे कार्य सुरु आहे. ट्रकने एमएम 46 ए 2199 क्रमांकाच्या ट्रॅक्टरला धडक दिली. काही तास ट्रॅक्टर उलटल्यामुळे एका बाजूची वाहतूक थांबविण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

  • 09 Jun 2023 07:11 AM (IST)

    महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची कार्यकारिणी आज जाहीर होणार

    आज शुक्रवार 9 जूनरोजी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. आज सकाळी 10 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्यवर्ती कार्यालय राजगड, शिवाजीपार्क, दादर येथे हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी मनसेचे असंख्य पदाधिकारी आणि चित्रपट सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Published On - Jun 09,2023 7:06 AM

Follow us
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.