AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांची फाईल, देवेंद्र फडणवीस यांचं फिल्टर अन् मुख्यमंत्र्यांची मोहोर, ट्रिपल इंजिन पण डबल फिल्टर?

अजितदादांची फाईल, देवेंद्र फडणवीस यांचं फिल्टर अन् मुख्यमंत्र्यांची मोहोर, ट्रिपल इंजिन पण डबल फिल्टर?

| Updated on: Aug 31, 2023 | 5:13 PM
Share

Tv9 Special Report | ट्रिपल इंजिन सरकारमध्ये डबल फिल्टरची होतेय चर्चा! अजित दादांना झटका देणारा निर्णय काय? देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना दिलेल्या झटक्याचा भाजपच्या कोणत्या नेत्याना दिलासा?

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ | ट्रिपल इंजिन सरकारमधल्या निर्णयांवर आता डबल फिल्टरची चर्चा आहे म्हणजे अजित पवारांनी एखादा निर्णय घेतल्यास, त्याची फाईल आधी फडणवीसांकडे जाईल आणि फडणवीसांच्या संमतीनंतर ती फाईल पुढे मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. या साऱ्याला एक निर्णय कारणीभूत ठरल्याची सध्या चर्चा सुरू आहे. 48 तासांपूर्वीच तुम्ही पुण्याचे सुपर पालकमंत्री आहात का? असा प्रश्न अजित पवारांना विचारला गेला होता. त्यावर तुझ्या तोंडात साखर पडो असं अजितदादा पत्रकाराला म्हणाले, मात्र त्याच्या 24 तासातच उपमुख्यमंत्री पहिले आणि उपमुख्यमंत्री दुसरे यात पहिले उपमुख्यमंत्रीच सुपर आहेत, हे स्पष्ट झालं. याचं कारण कारखानदारांना कर्ज देण्यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवारांनी एका आठवड्याभरापूर्वीच घेतलेला निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बदलून अजित पवारांना झटका दिलाय. निर्णय काय होता तो बदलून काय झाला बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 30, 2023 10:37 PM