Delhi Lal Quila Blast : दिल्ली स्फोट हा बदला! जैशचं हेडक्वार्टर उडवलं म्हणून… कार स्फोटामागं जैश-ए-मोहम्मद, कनेक्शन थेट अफगाणिस्तानपर्यंत…
तुर्कस्तान आणि अफगाणिस्तानमधून या कटाचे सूत्रसंचालन झाले. जैशचे बहावलपूर मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा बदला म्हणून हा स्फोट घडवण्यात आला. स्फोटकांसाठी अमोनियम नायट्रेट वापरले गेले असून, काही स्फोटकांचा शोध सुरू आहे
दिल्ली स्फोटाचे धागेदोरे तुर्कस्तान आणि अफगाणिस्तानपर्यंत पोहोचले आहेत. जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर मुख्यालय ऑपरेशन सिंदूर दरम्यान उद्ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी हा बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचे बोलले जात आहे. तुर्कस्तान आणि अफगाणिस्तानमधील हँडलर्स या डॉक्टर मॉड्यूलच्या संपर्कात होते. त्यांनी एक टेलिग्राम ग्रुप तयार केला होता, ज्याद्वारे ते एकमेकांशी संवाद साधत होते आणि हल्ल्याचे नियोजन करत होते. डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कस्तानला गेल्याचेही उघड झाले आहे. या पाच डॉक्टरांच्या मॉड्यूलमध्ये डॉक्टर उमर नबी सर्वात जहाल होता आणि तो नेहमी देशभरात स्फोट घडवण्याची भाषा करत असे, अशी माहिती अटक केलेल्या डॉक्टर शाहिनने पोलिसांना दिली आहे.
प्राथमिक तपासातून असे दिसून येते की, जैश-ए-मोहम्मदने बहावलपूरमधील त्यांच्या मुख्यालयाच्या विध्वंसाचा बदला घेण्यासाठी दिल्लीत हा स्फोट घडवला. उमर नबीने दिल्लीत आत्मघातकी स्फोट घडवून आणला असून, जम्मू-काश्मीर पोलिसांनी टाकलेल्या एका छाप्यातून तो यापूर्वी पळाला होता. यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

