IndiGo Flight : एअर इंडियानंतर इंडिगो फ्लाईटमध्ये गडबड? दिल्लीहून लेहला टेकऑफ अन् अचानक इमर्जन्सी लँड, कारण काय?
गुरुवारी सकाळी दिल्लीहून लेहला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6E 2006 ला तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि लेहला पोहोचण्यापूर्वीच तांत्रिक बिघाड आढळून आला.
दिल्लीहून लेहला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे लेहला टेकऑफ झालेले विमान दिल्लीला परतले आहे. या विमानात एकूण १८० प्रवासी होते. दिल्ली विमानतळावरून या विमानाचे टेकऑफ झाले. त्यानंतर विमानाने अर्धे अंतर कापले असताना या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले आणि पायलटने अचानक विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. कधी अहमदाबादहून, कधी लखनऊमध्ये तर कधी कोलकातामध्ये टेकऑफ झाल्यानंतर अर्ध्या प्रवासानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. या अपघातात विमानातील २४१ प्रवाशांसह एकूण २६८ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २ पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही याच अपघातात निधन झाले. सध्या या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची डीएनएद्वारे ओळख पटवली जात आहे, जेणेकरून मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवता येतील. आतापर्यंत एकूण २१० मृतदेहांचे डीएनए मॅचिंग करण्यात आले आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

