AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय

शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय

| Updated on: Mar 28, 2026 | 12:43 PM
Share

एकीकडे इराण युद्धाला महिना होत आला असून अजूनही युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे इंधन आणि गॅसची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे आता लोक पुन्हा एकदा चुलींकडे वळत आहेत.

इराण युद्धाच्या फटका इंधन आणि गॅसला बसला असल्याने अनेक ठिकाणी स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा लोक चुलीच्या स्वयंपाकाकडे वळले आहेत. आता धुळे शहरातही गॅस सिलिंडर टंचाईमुळे मातीच्या चुलींना मागणी वाढली आहे. येथील कुंभार आता मडकी आणि इतर मातीच्या वस्तूसोबत चुली देखील विकत आहे. परंतू आता माती आणि लीद मिळत नसल्याने चुली तयार करण्यात अडचणी येत असल्याचे कुंभाराचे म्हणणे आहे.सरकारने युद्धजन्य स्थितीत लॉकडाऊन होणार नाही असे जरी म्हटले असले गॅस सिलिंडर बुक करण्यास वेळ लागत असून त्याचा कालावधी देखील वाढला असल्याने जनता आता पुन्हा पारंपारिक चुलीकडे वळली आहे.

Published on: Mar 28, 2026 12:43 PM
Follow Us