कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमारची निदर्शन, काय आहे कारण?
VIDEO | कर्नाटकतर्फे होणाऱ्या पाणी चोरी विरोधात संभाजी आरमार संघटनेतर्फे निदर्शने
सोलापूर : सोलापूरच्या हक्काचे पाणी कर्नाटक पळवत असल्याच्या निषेधार्थ संभाजी आरमार संघटनेच्यावतीने आज निदर्शने करण्यात आली. संभाजी आरमारतर्फे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ही निदर्शने करण्यात आली. सोलापूर शहरातील अनेक भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तर काही भागात अद्यापही आठ दिवसाला एकदा पाणी मिळतं. ही वस्तुस्थिती असताना कर्नाटक सरकार सोलापूरच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकत आहे. याकडे सोलापूरच्या प्रशासनाचे दुर्लक्ष असून झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आहे हे आंदोलन करत असल्याची भूमिका संभाजी आरामारची असल्याचे सांगण्यात येत आहे.
Published on: Mar 27, 2023 11:13 PM
Latest Videos
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

