अजित पवार यांचं बारामतीतील जंगी स्वागत पाहिलंत का? अजितदादांच्या स्वागतसाठी कार्यकर्ता थेट क्रेनला लटकला
VIDEO | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील स्वागतासाठी कार्यकर्त्यांची उडाली झुंबड, अजित पवार यांच्या बारामतीतील स्वागतसाठी कार्यकर्ता लटकला थेट क्रेनला, बघा व्हिडीओ
बारामती, २६ ऑगस्ट २०२३ | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामतीत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांना आज बारामतीकरांकडून नागरी सत्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्याआधी त्यांची कार्यकर्त्यांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार हे त्यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांचे यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, जेसीबाने फुलांची उधळण करत बारामतीत स्वागत करण्यात आलं. अजित पवार यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात कोणतीही कसूर सोडली नसल्याचं बघायला मिळाले. इतकेच काय तर अजित दादांच्या स्वागतसाठी कार्यकर्ता थेट क्रेनला लटकल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते आणि बारामतीकर एकवटले होते. अजित पवार यांचं बारामतीत जंगी स्वागत करण्यात आलं. अजित पवार यांच्यावर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात अजित पवार यांची भव्य मिरवणूक बारामतीत काढण्यात आली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

