Maharashtra DCM Swearing-in : बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
Maharashtra DCM Eknath shinde Swearing-in : एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असेपर्यंत हा सस्पेन्स कायम होता. मात्र भाजप नेते आणि शिवसेना आमदारांच्या मणधरणीला यश आलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला 288 पैकी तब्बल 230 जागांवर यश मिळालं. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते, तर दुसरीकडे भाजप देखील गृहमंत्रिपदासाठी इच्छूक असल्याने त्यांनी ते देण्यास नकार दिला. मात्र भाजपकडून करण्यात आलेल्या आता एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीनंतर भाजपला यश आलं यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असेपर्यंत हा सस्पेन्स कायम होता. मात्र भाजप नेते आणि शिवसेना आमदारांच्या मणधरणीला यश आलं. अखेर एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ‘महा’शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं.