देवेंद्र फडणवीस यांनी गायलं श्रीवल्ली गाणं तर नितीन गडकरी यांनी नाराज… व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
देवेंद्र फडणवीस यांनी एका लग्न सोहळ्यात “नज़रें मिलते ही नज़रों से नज़रों को चुराए ...” हे गाणं गायल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. नागपूरमधील उद्योजक प्यारे खान यांच्या मुलीच्या लग्नाचे रिशेप्शन होते. यावेळी त्यांनी हे गाणं गायलं
नागपूर, ५ नोव्हेंबर २०२३ | सध्या सोशल मीडियावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गाणं गात असल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितीन गडकरी हे एका कार्यक्रमात हजर असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अल्लू अर्जूनच्या श्रीवल्ली या हिट गाण्यातील काही ओळी गायल्याचे पाहायला मिळाले. तर तुझसे नाराज नही जिंदगी हे गाणं नितीन गडकरी यांनी गायलं. नागपूरमधील उद्योजक प्यारे खान यांच्या मुलीच्या लग्नाचे रिशेप्शन होते. या कार्यक्रमास नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी दोन्ही नेत्यांनी गीत गायल्याचे पाहायला मिळाले.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'

