AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 20, 2026 | 3:10 PM
Share

अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. सर्वसामान्यांनीही जाणून घेण्यासारख्या बाबी त्यांनी सांगितल्या.

अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. सर्वसामान्यांनीही जाणून घेण्यासारख्या बाबी त्यांनी सांगितल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, “महाटेक सीएसआर कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आला. मोठ्या प्रमाणात टेक कंपन्या आणि इतर सीएसआर पार्टनरसोबत जवळपास 150 कोटींचे करार या ठिकाणी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये या कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी सीएसआर ॲक्टिव्हिटी करणार आहेत. मूळात आपल्याकडे सर्वात जास्त सीएसआर महाराष्ट्रात येतो, पण गेली अनेक वर्षे तो एमएमआर आणि पीएमआर रिजनमध्ये जास्त खर्च होतो,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “हा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्राच्या सर्व भागात गडचिरोलीपासून नंदुरबारपर्यंत सीएसआर ॲक्टिव्हिटी चालावी. प्रयत्न असा आहे की शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकासाचं क्षेत्र असेल अशा विविध क्षेत्रांमध्ये सीएसआर पार्टनर्ससोबत पार्टनरशिप करून एका स्केलवर या सगळ्या गोष्टी नेण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं एक नवीन सुरुवात आयटी विभागाने केली आहे. दरवर्षी असा कॉनक्लेव्ह होईल,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, “काल महाराष्ट्रात 25 मेगावॅटचे न्युक्लिअर करार केले.” यानंतर ते शरद पवारांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं यावरही बोलले होते.

Published on: May 20, 2026 03:03 PM
Follow Us