… म्हणून देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी, अन्यथा…; जालन्यातील लाठीचार्जवर प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य
जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेनंतर वातावरण शांत राहवं म्हणून फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली अन्यथा तसं काही कारण नव्हतं असं मोठं वक्तव्य भाजपचे नेते प्रविण दरकेर यांनी केले आहे. या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनीही केली सडकून टीका
मुंबई, १० डिसेंबर २०२३ : जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेनंतर वातावरण शांत राहवं म्हणून फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली अन्यथा तसं काही कारण नव्हतं असं मोठं वक्तव्य भाजपचे नेते प्रविण दरकेर यांनी केले आहे. तर यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, दरेकरांना फडणवीस यांनी सांगितलं असेल बोल म्हणून, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. दरेकर म्हणाले, राज्यकर्ता म्हणून राज्याचा गृहमंत्री म्हणून परिस्थिती हाताळणं हे त्यांच्यासमोर पहिलं आव्हान असतं. त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपला इगो, कमीपणा ते समजले नाहीत तर तेथील वातावरण शांत करणे ही प्रायोरिटी होती म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असल्याचे दरेकर यांनी म्हटले. तसं देवेंद्र फडणवीस यांचं काही चुकलं नव्हतं. दिलगिरी मागण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु माझ्याइगो पेक्षा महाराष्ट्रला शांत होणं महत्त्वाचं आहे, असं त्यांना वाटलं, असेही दरेकरांनी म्हटलं आहे.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

