'मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की...', आझाद मैदानावर आज भव्य शपथविधी सोहळा

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की…’, आझाद मैदानावर आज भव्य शपथविधी सोहळा

| Updated on: Dec 05, 2024 | 10:47 AM

नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एकमेव प्रस्तावाला एकमताने मान्यता दिल्याने फडणवीस यांची निवड झाल्याची निरीक्षक विजय रूपानी यांनी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा अधिकृत चेहरा...

राज्याचे पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होणार हे आता निश्चित झालं आहे. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे आणि आज संध्याकाळी साडे पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेते पदी निवड झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस पर्वाची सुरूवात झाली. नेता निवड करण्यासाठी भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्याला समर्थन दिलं. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एकमेव प्रस्तावाला एकमताने मान्यता दिल्याने फडणवीस यांची निवड झाल्याची निरीक्षक विजय रूपानी यांनी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा अधिकृत चेहरा… त्यामुळे भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आणि तिन्ही नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी स्वतः एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांची शपथ देण्याची विनंती केली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 05, 2024 10:47 AM