Devendra Fadnavis | ‘तो’ शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतो : फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा असू शकते. पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक शनिवारी माध्यमांसमोर आले. त्यानंतर आज सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा असू शकते. पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI