लोकसभा लढवणार की विधानसभा?; देवेंद्र फडणवीस यांनी अखेर सांगूनच टाकलं
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आणि लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, दिल्लीत केंद्रात जाण्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला
मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आणि लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, दिल्लीत केंद्रात जाण्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. मी नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले आहे, तर जी निवडणूक लढवणार आहे. ती विधानसभेची निवडणूक असणार आहे. मी १० वर्षांनीही भाजपमध्येच असणार आहे. इतकेच नाहीतर भाजप जे सांगेल तेच मी करणार आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. अनौपचारिक झालेल्या गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना ब्रेक दिला आहे.
Latest Videos
Latest News