Devendra Fadnavis oath ceremony | मी देवेंद्र गंगाधर फडणवीस… राज्यपालांनी फडणवीसांना दिली पद आणि गोपनियतेची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फडणवीसांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच फडणवीस यांनी एक ट्वीट करत पक्षाचा आदेश मला शिरोधार्य असल्याचं सांगितलं.

सागर जोशी

|

Jun 30, 2022 | 11:12 PM

एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. मी सत्तेबाहेर असेल, पण सरकार चालावे ही माझी जबाबदारी असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. मात्र, अवघ्या काही वेळातच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माध्यमांसमोर येत फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं, त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी असा आग्रह धरला. केंद्रीय पातळीवर सूत्रे हलली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फडणवीसांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेच फडणवीस यांनी एक ट्वीट करत पक्षाचा आदेश मला शिरोधार्य असल्याचं सांगितलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें