CM Devendra Fadnavis : भुजबळांना मंत्रिपद; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Cm Devendra Fadnavis On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचा चेहरा आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भुजबळांच्या मंत्रिपदावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत. देशातला ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळ यांच्याकडे पहिलं जातं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवर भाष्य केलं. छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होते. त्यांनी आपली नाराजी देखील अनेकवेळा बोलून दाखवली होती. त्यानंतर आज अखेर त्यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘महायुतीतल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं आम्ही देखील स्वागत केलं. प्रत्येकाबद्दल सगळ्यांची वेगवेगळी मतं असू शकतात. त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. मात्र भुजबळांसारखे ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी समाजाचा हितचिंतक आमच्या मंत्रिमंडळात आल्याने त्याचा फायदा निश्चितच होईल, असा विश्वास यावेळी बोलताना फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

