Chhagan Bhujbal : असा काय नाईलाज, सभ्य माणसं नाहीत का राजकारणात? छगन भुजबळ यांच्या शपथविधीपूर्वीच अंजली दमानिया यांची ती पोस्ट व्हायरल
Anjali Damania : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे अगदी थोड्याच वेळात मंत्रीपदाची शपथ घेत आहे. धनंजय मुंडेंचं खातं त्यांना मिळेल. या शपथविधीपूर्वीच अंजली दमानिया यांची समाज माध्यमावरील एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

ओबीसी चळवळीचा चेहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच्या रिक्त खात्याचा कारभार भुजबळांच्या खाद्यांवर येईल. सत्तेत आल्यावर भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. आता ही नाराजी दूर होत आहे. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा तोफ डागली आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे दमानिया यांनी भुजबळाविरोधात पुन्हा एकदा शड्डू ठोकल्याचे दिसून येते.
अंजली दमानिया यांची पोस्ट चर्चेत




छगन भुजबळ यांनी एक आठवड्यापूर्वीच मंत्री पदाबाबत ठरल्याची माहिती त्यांनी दिली. भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने नाशिकसह येवल्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. तर दुसरीकडे आता त्यांच्याविरोधात अंजली दमानिया समोर आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहिली आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खडा सवाल केला आहे.
छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?
वाह फडणवीस वाह !
म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ?
असा… pic.twitter.com/dLj7MN79JE
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 20, 2025
असा काय नाईलाज?
दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात वाह फडणवीस वाह ! म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात? अशी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी मोठा धुराळा उडवून दिला.
आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचार्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? असा खोचक सवाल दमानिया यांनी केला. किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची कालच्या घोषणा आठवतात ? “भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार”, “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम” हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?, असा खडा सवाल दमानिया यांनी भाजपाला विचारला आहे.
भ्रष्ट मंत्री थोपावला
छगन भुजबळ मंत्री म्हणून शपथ घेत आहेत हे मला कळालं तेव्हा असच अस्वस्त वाटलं. राग आला, अशी प्रतिक्रिया आज सकाळी अंजली दमानिया यांनी माध्यमांना दिली. असं कसं एक भ्रष्ट मंत्री गेला तर त्याच्या जागेवर दुसरा भ्रष्ट मंत्री आपल्या डोक्यावरती थोपवला जात आहे.भुजबळ विरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढलो. त्यांच्यावरती सात घोटाळे आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळा, कलिना लायब्ररी सह 53 कोटीचे देखील घोटाळे आहेत. इतके घोटाळे असून तरी तुम्हाला त्याच माणसाला मंत्री म्हणून घ्यायचाय तुम्हाला चांगली माणसं मिळत नाही का राजकारणात, असा सवाल त्यांनी विचारला. एकीकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढून त्यांचा राजीनामा घेतोय तर दुसरीकडे जे अडीच वर्ष जेलची वारी करून आलेत छगन भुजबळ आमच्या डोक्यावरती थोपवत आहात, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुरावे देऊन काय झालं?
सिंचन घोटाळा वेळेवर अनेक पुरावे देवेंद्र फडणीस यांना दिले. त्याच घोटाळ्यात असलेल्या अजित पवार आणि तटकरे यांना देवेंद्र फडणीस हे बरोबर घेत आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा यामध्ये जीव ओतून काम करत एफआयआर करून भुजबळांना जेलवारी झाली. त्यांना अडीच वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. छगन भुजबळ, अशोक चव्हाण यांना मंत्रीपद देत असेल तर अशांना काय म्हणावं आणि राजकारण इतकं किळसवानं का? चांगल्या माणसाला राजकारणात का घेत नाही असा प्रश्न मलाही नाना पाटेकर आणि सर्वांना पडत आहे. यांना मंत्रीपद देत असेल तर असं वाटतं की तुम्ही किती लढा आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला जे हवे त्यान्हा आम्ही घेणार असं राजकारण सुरू आहे का, असा सवाल त्यांनी केला.
हा तमाशा बघवत नाही
भाजप सरकारने भ्रष्टाचार नको असे वेगवेगळे बॅनर बनवले. मोदींनीही सांगितलं होतं 2014 आणि 2024 मध्ये भ्रष्टाचार वरती कारवाई करणार मग आता हे बॅनर आणि यांचे हे विचार गेले कुठे असा सवाल त्यांनी केला. माझ्या एका फोटोमध्ये सगळे गाजलेले भ्रष्टाचारी आहेत त्यात नारायण राणे ,प्रफुल पटेल या सर्वांच्या मध्ये देवेंद्र फडणीस बसलेले दिसले त्यामुळे या लोकशाहीला काय म्हणावं, असा सवाल त्यांनी केला.
लोकशाहीचा चाललेला तमाशा हा बघवत नाही. एकीकडे दहशतवाद विरोधात ऑपरेशन सिंदूर करतात मग भ्रष्टाचाराच्या या दहशतवादाला आपण काय म्हणणार, हे भ्रष्टाचारी दहशतवादीच आहे, हे बंद झाले पाहिजे म्हणून आम्ही लढत आहोत. मात्र आता हे सगळं थांबवाय सारखं वाटतं असल्याची प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली.