Dhananjay Deshmukh : बावनकुळेंनी भूमिका मांडायला हवी होती.., धनंजय देशमुखांनी व्यक्त केली खंत
Dhanajay Deshmukh Latest News : प्रदेशाध्यक्ष असताना देखील बावनकुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही याची खंत वाटत असल्याचं आज धनंजय देशमुख यांनी म्हंटलं आहे.
काल मुख्यमंत्री जरी म्हंटलेले असले की, सीआयडीला कुठला पुरावा असता तर अजून आरोपी या प्रकरणात सापडले असते. मात्र तपास संपला नाही, सप्लीमेंट्री चार्ज दाखल होणं बाकी आहे, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महीने पूर्ण होत आले आहेत. अद्यापही न्यायाची लढाई संपलेली नाही. आज धनंजय देशमुख यांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला त्यावेळी धनंजय देशमुख यांनी आता न्यायाचा दूसरा भाग सुरू झाला आहे. जे लोक गुन्हा करून स्वत:ला निर्दोष समजत आहेत, त्यांना आम्ही आता समोर आणण्यासाठी लढा देणार आहे, असं सांगितलं.
पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, आम्ही या प्रकरणात अजून काही पुरावे सादर करणार आहे. त्यानंतर अजून बरेच चेहेरे आरोपी म्हणून समोर येणार आहेत. एक आरोपी अद्यापही फरार आहेत. तो सापडल्यानंतर देखील बरेच खुलसे होणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी एका बूथ प्रमुखावर झालेल्या अत्याचारासाठी कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी खंत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. माझा भाऊ बूथ प्रमुख होता. तरीही त्यांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया देऊ नये याची मला खंत वाटते. मुख्यमंत्री चांगले असले तरी इतर नेत्यांनी देखील त्यात खारीचा वाटा घेतला पाहिजे, प्रजेमुळे राजा असतो. एवढीच वेदना आहे.