Dhananjay Munde : …तेव्हाच सातपुडा बंगला सोडेल, धनंजय मुंडे यांनी शासकीय निवासस्थान सोडण्यासंदर्भात स्पष्टच सांगितलं
मुंबईतील बंगला न सोडण्यामागे मुंडेंनी दोन कारणं सांगितली होती एक म्हणजे धनंजय मुंडेंचं आजारपण आणि त्यांच्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न… त्यामुळे मुंडेंनी बंगला सोडण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचे म्हटले होते
राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मुंबईतील घराचं काम पूर्ण झाल्यावर सातपुडा हा शासकीय बंगला सोडणार असल्याचं स्पष्टीकरण माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यायोग्य नसल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तर मुंबईतील घरात सध्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याचीही माहिती यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली. यासह माझ्या आजारावरील उपचारांकरता मला मुंबईत राहणं गरजेचं असल्याचेही त्यांनी म्हटलंय. तर माझ्या मुंबईतील घराचं काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान असलेला सातपुडा हा बंगला सोडेन, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी होणाऱ्या टीका आणि आरोपांदरम्यान केलं आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद गेल्यांतरही अद्याप सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही. यामुळे त्यांच्यावर आतापर्यंत 42 लाख रुपयांचा मोठा दंड लावण्यात आला आहे. असे असताना धनंजय मुंडे हा मोठा दंड कधी भरणार की भरणारच नाही? शासकीय बंगला कधी सोडणार? याची चर्चा सध्या सुरू आहे.

