Dhananjay Munde : …तर भावांनो, तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही, मुंडेंचा जरांगे अन् मराठा आंदोलकांना थेट इशारा!
धनंजय मुंडेंनी तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांना दिला आहे. वंजारी समाजासाठी एसटी आरक्षणाची मागणी करताना त्यांनी हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला. मराठा आरक्षणासाठी गॅझेटचा वापर होत असेल, तर इतरांनाही लाभ मिळावा, अशी त्यांची भूमिका आहे.
धनंजय मुंडेंनी मराठा आंदोलकांना अप्रत्यक्षपणे इशारा देत, “तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही” असे वक्तव्य केले आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव येथे वंजारी समाजाच्या एसटी आरक्षण आंदोलनादरम्यान त्यांनी हे विधान केले. शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे यांनी आंदोलनकर्त्यांशी मुंडेंचे फोनवर बोलणे करून दिल्यानंतर हे घडले.
धनंजय मुंडे यांच्या मते, जर हैदराबाद गॅझेटचा फायदा मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी होत असेल, तर वंजारी समाजालाही त्या गॅझेटनुसार एसटी आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. पूर्वी वंजारी समाज दोन टक्के ओबीसी आरक्षणात समाधानी होता, परंतु आता काही घटक दोन टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी करत असल्याने, त्यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. यामुळे आरक्षणावरून महाराष्ट्रात नवा राजकीय वाद निर्माण झाला असून, सरकारवर विविध समाजांकडून आरक्षणाच्या मागण्यांचा दबाव वाढत आहे.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..

