Diesel Hike | डिझेलच्या किमतीत 25 पैशांनी वाढ, पेट्रोलच्या दरात कोणताही बदल नाही

Petrol price | ल्या काही दिवसांत इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी पुन्हा उलटा प्रवास सुरु केल्याने मोठ्या इंधन दरवाढीचे संकेत मिळू लागले आहेत.

देशभरात पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कारण डिझेलच्या दरात पुन्हा एका वाढ होताना दिसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या किंमतींप्रमाणे डिझेलच्या प्रतिलीटर दरात 25 ते 27 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलची किंमत स्थिर आहे. यापूर्वी शुक्रवारीही डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली होती. सध्या मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.26 रुपये आणि प्रतिलीटर डिझेलसाठी 96.68 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 101.19 रुपये इतका आहे. मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत इंधन दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी पुन्हा उलटा प्रवास सुरु केल्याने मोठ्या इंधन दरवाढीचे संकेत मिळू लागले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI