‘या’ महामार्गावरील पुलाची दुरावस्था, लोखंडी रॉड आले बाहेर; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
VIDEO | नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील पुलाची दुरावस्था, प्रकाशा ते तळोदा दरम्यान असलेल्या पुलावर असलेल्या सदगव्हाण गावाजवळ स्लॅबचे लोखंडी रॉड आले बाहेर, बघा व्हडिओ
नंदुरबार, १२ सप्टेंबर २०२३ | नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील अनेक छोट्या नदी नाल्यांवरील पुलांची दुरावस्था झाली आहे. तर काही पूल धोकेदायक स्थितीमध्ये आहेत. या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट होणे गरजेचे आहे. बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या अनेक लहान-मोठ्या पुलंच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. या महामार्गावर तळोदा ते प्रकाशादरम्यान असलेल्या सदगव्हाण गावाजवळ असलेल्या पुलाची दुरावस्था झाली आहे. पुलाच्या स्लॅबवरील लोखंडी रॉड बाहेर आले आहेत, हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकेदायक झाला असून अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. हा एक पूल फक्त या महामार्गावरील उदाहरण आहे. असे अनेक लहान-मोठे पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकेदायक आहेत. या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी वाहनधारक आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...

