Dinanath Mangeshkar Hospital : जमीन दान करणाऱ्यांकडूनही मंगेशकर रुग्णालयाने घेतले उपचाराचे 3 लाख; भाऊसाहेब खिलारेंच्या मुलाला अश्रु अनावर
Chitrasen Khilare : दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा दान करणाऱ्या खिलारे कुटुंबाला गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे अश्रु अनावर झालेले बघायला मिळाले. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुणे गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आता चित्रसेन खिलारे यांना अश्रु अनावर झालेले बघायला मिळाले आहेत. खिलारे कुटुंबीय आता लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहे. खिलारे कुटुंबीयांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा दान दिलेली आहे. या संपूर्ण प्रकरणी जागा मालक खिलारे लवकरच फडणवीसांची भेट घेणार आहे. आम्ही जागा दिली त्याचा आता पश्चाताप होतो आहे, असंही खिलारे यावेळी म्हणाले.
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात केवळ 10 लाख अॅडव्हान्स भरले नाही म्हणून गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून न घेतल्याने तिचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता रुग्णालयाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. याच संदर्भात मंगेशकर रुग्णालयाला जागा दान देणारे खिलारे कुटुंबातले चित्रसेन खिलारे यांना अश्रु अनावर झालेले आहेत. टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधी सोबत बोलताना आपल्याला ही जागा दान दिल्याचा आता पश्चाताप होत असल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे. तसंच या प्रकरणी खिलारे कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. या महिलेची मुलं आपल्या आईला मुकली, मुलं मोठी होतील तेव्हा त्यांना आपण काय सांगणार? आपल्याला याबद्दल काहीही संवेदनशीलता नाही. चित्रसेन खिलारे यांच्या वडिलांनी 6 एकर जागा मंगेशकर रुग्णालयाला दान केली होती. त्याच जमिनीवर आज एका गर्भवती महिलेची पैशांसाठी अडवणूक करण्यात आल्याने खिलारे यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

