Video : भिती वाटत असेल राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येत जावं- दिपाली सय्यद

राज ठाकरेंच्या (Raj Tackeray) अयोध्या दौऱ्यावरुन (Ayodhya Visit) सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. कारण राज्यात भाजप नेते राज ठाकरेंच्या दौऱ्याचं आणि हिंदुत्वाच्या भूमिकेचं भाजप नेते भरभरून समर्थन करत आहेत. मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशातील एका भाजप खासदारानेच राज ठाकरेंच्या या दौऱ्याला कडाकडून विरोध केल्यामुळे या दौऱ्याचंं नेमकं काय होणार? हे चिंत्र अद्याप स्पष्ट होत नाही. उत्तर […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 18, 2022 | 5:58 PM

राज ठाकरेंच्या (Raj Tackeray) अयोध्या दौऱ्यावरुन (Ayodhya Visit) सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. कारण राज्यात भाजप नेते राज ठाकरेंच्या दौऱ्याचं आणि हिंदुत्वाच्या भूमिकेचं भाजप नेते भरभरून समर्थन करत आहेत. मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशातील एका भाजप खासदारानेच राज ठाकरेंच्या या दौऱ्याला कडाकडून विरोध केल्यामुळे या दौऱ्याचंं नेमकं काय होणार? हे चिंत्र अद्याप स्पष्ट होत नाही. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी ज्या उत्तर भारतीयांना मुंबईतून धोपटून लावलं, त्यांची माफी मागावी आणि मगच अयोध्यात यावं, नाहीतर राज ठकारेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. मनसेकडून मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र याच मुद्द्यावरून आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरे आणि मनसेला डिवचलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें