अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने अखेर एफआयआर दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सामूहिक बलात्कार, हत्या आणि षडयंत्राचे आरोप लावण्यात आले आहेत. दिशाच्या वडिलांच्या जबाबातून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, सचिन वाझे यांच्यासह अनेक संशयितांची नावे समोर आली आहेत. सीबीआय आता भक्कम पुराव्यांच्या आधारे तपास करणार आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून गाजत असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अखेर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर (First Information Report) दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने सामूहिक बलात्कार, हत्या आणि षडयंत्र रचल्याच्या आरोपांखाली हा गुन्हा नोंदवला आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या जबाबामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड, सचिन वाझे, परमबीर सिंग, अनिल देशमुख, दिनो मोरिया आणि सुरज पांचोली यांच्यासह मालवणी पोलीस ठाण्यातील तत्कालीन तपास अधिकाऱ्यांची नावे संशयित म्हणून नमूद करण्यात आली आहेत. सीबीआयने संशयित गुन्हा (Suspected Offence) या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. उच्च न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिले आहेत की, जबाबातील नावांना लगेच आरोपी मानू नये, तर भक्कम पुराव्यांच्या आधारे तपास करून आरोपपत्र दाखल करावे. येत्या काळात सीबीआयचा तपास काय दिशा घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Published on: Sep 14, 2026 02:41 PM
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी

