अन् साताऱ्यातील पुसेसावळी गावात दोन गटात संघर्ष, एकानं गमावला जीव; नेमकं काय घडलं?
VIDEO | साताऱ्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी या गावात दोन गटात तुफान राडा, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी दोन गटात झाला संघर्ष, गावाला आलं पोलीस छावणीचं स्वरूप, बघा काय आहे परिस्थिती?
सातारा, ११ सप्टेंबर २०२३ | साताऱ्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी या गावातून मोठी बातमी समोर येत आहे. या गावात दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. यावेळी दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री घडली. याघटनेनंतर संबंधित परिसरातील इंटरनेट सुविधा पूर्णतः बंद कऱण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर काल झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी पुसेसावळी गावात दोन गटामध्ये हा संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आज या गावात संपूर्ण तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. तर संपूर्ण गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

