Marathi Language Issue : …तरच पैसे देणार, मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमध्ये काय घडलं? बघा VIDEO
भांडुप परिसरातील साई राधे नावाच्या इमारतीत असलेल्या पिझ्झाच्या एका ग्राहकाने रोहित लेवरेला मराठी येत नसल्याने पिझ्झाचे पैसे देण्यास नकार दिला. ग्राहक म्हणाला की जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला मराठी बोलावे लागेल.
मुंबईत पुन्हा एकदा हिंदी आणि मराठी भाषेचा वाद दिसून आला आहे. मुंबईतील भांडूप परिसरात पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि मराठी दाम्पत्यामध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. मराठीत बोल तरच पैसे देऊ म्हणत भांडूपमधील मराठी दाम्पत्याने पिझ्झा डिलिव्हरी बॉयसोबत वाद घातला आहे. भांडूपमधील साई राधे या सोसायटीमध्ये रोहित लेवरे नावाचा मुलगा पिझ्झा देण्यासाठी आला होता. सोमवारी रात्री (१२ मे) हा प्रकार घडला. डिलिव्हरी बॉयने ही संपूर्ण घटना त्याच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली. या व्हिडिओमध्ये ग्राहक फक्त मराठीत बोलावे लागेल असे म्हणत एक प्रकारे जबरदस्ती करत असल्याचे दिसत आहे. या वादानंतर डिलिव्हरी बॉयला पैसे न घेता परत जावे लागल्याची माहिती मिळतये. मात्र आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

